vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी होणार

जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी होणार

मुंबई, प्रतिनिधी : दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ च्या कलम-९१ अन्वये जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत अधिकारी, कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्रांची (UDID CARD) पडताळणी करण्यात येणार आहे. विभागाकडून त्याबाबतच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना देण्यात आल्या आहेत. दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्र वैधतेबाबत विभागास अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने ही पडताळणी करण्यात येत असल्याचे दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी सांगितले आहे.

जिल्हा परिषदांमधील संबंधित सर्व विभागांतर्गत शिक्षण, आरोग्य, बांधकाम तसेच सर्व विभागात कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रमाणपत्रांची तपासणी करून लाक्षणीक दिव्यांगत्व (Benchmark Disability) असलेल्या व्यक्तींनाच शासनमान्य लाभ देण्यात येणार आहेत. पडताळणीअंती बनावट व नियमबाह्य प्रमाणपत्र किंवा ४० टक्यांपेक्षा कमी दिव्यांगत्व असल्याचे आढळल्यास संबंधितांना लाभ अनुज्ञेय केला जाणार नाही. अशा व्यक्तींना दिलेले लाभ बंद करण्यात येतील व त्यांनी घेतलेल्या लाभाबाबत कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ च्या कलम-९१ नुसार, अपात्र व्यक्तीने लाभ घेतल्यास किंवा घेण्याचा प्रयत्न केल्यास त्यास दोन वर्षांपर्यंत कारावास, एक लाखापर्यंत दंड किंवा या दोन्ही शिक्षा होऊ शकतात. त्यामुळे पडताळणीअंती अपात्र ठरविण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांवर संबंधित तरतुदीनुसार कठोर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी दिली आहे.

००

संबंधित पोस्ट

नांदेड- मुंबई ‘ वंदे भारत एक्सप्रेस’ ने उघडले मराठवाड्याच्या समृद्धीचे द्वार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,नांदेड – मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ

महाराष्ट्राला प्रगतीच्या शिखरावर नेणाऱ्या योजनांना गती द्यावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शंभर दिवसांच्या कार्यक्रमातील प्रलंबित विषयांचा आढावा

vishwatmaklokswamivarta

अन्न व औषध प्रशासनाकडून प्रतिबंधित हुक्क्याचा ३१ कोटी रुपये किमतीचा साठा जप्त मंत्री नरहरी झिरवाळ यांची माहिती

राज्य अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स ; ३६४ पदांना, त्यासाठीच्या खर्चास मान्यता..

vishwatmaklokswamivarta

ठाण्यात १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजराआमदार निरंजन डावखरे, उपमहापौर कृष्णा पाटील आणि जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या उपस्थितीत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

एसटी महामंडळाचा उपक्रम;-प्रवाश्यांच्या समस्या निराकरणासाठी प्रत्येक बुधवारी “प्रवासी राजा दिन” व “कामगार पालक दिन