vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत नवी मुंबईतील धार्मिक स्थळांची विशेष स्वच्छता मोहीम..

स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत नवी मुंबईतील धार्मिक स्थळांची विशेष स्वच्छता मोहीम..

       नवी मुंबई प्रतिनिधी- ‘स्वच्छ भारत मिशन’च्या वतीने जाहीर करण्यात आल्याप्रमाणे 17 सप्टेंबरपासून ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानास सुरूवात करण्यात आलेली असून पंधरवडा कालावधीत दररोज आयोजित करावयाच्या विविध उपक्रमांचे महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार कॅलेंडर तयार करण्यात आलेले आहे. त्यानुसार प्रत्येक दिवशी स्वच्छताविषयक विविध उपक्रम आयोजित करण्यात येत असून त्यामध्ये महापालिका अधिकारी, कर्मचारी व स्वच्छताकर्मींप्रमाणेच लोकसहभागावर विशेष भर दिला जात आहे.

          त्या अनुषंगाने धार्मिक स्थळांच्या व त्या भोवतालच्या परिसराच्या सखोल स्वच्छता मोहीमांचे अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे यांच्या माध्यमातून मुख्य स्वच्छता अधिकारी श्री.राजेंद्र इंगळे तसेच सर्व विभागांचे स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक, उपस्वच्छता निरीक्षक यांच्या सहयोगातून सर्व विभागांमध्ये आयोजन करण्यात आले होते.

            बेलापूर विभागामध्ये सहा. आयुक्त श्री.अमोल पालवे व स्वच्छता अधिकारी श्री.नरेश अंधेर यांच्या नियंत्रणाखाली बालाजी टेकडी येथील परिसराची माता अमृतानंदमयी मठाचे संचालक व सदस्य तसेच इतर संस्थांचे सदस्य आणि महापालिका अधिकारी, कर्मचारी, स्वच्छताकर्मी यांच्या एकत्रित सहभागातून यशस्वी रितीने साफसफाई करण्यात आली. नेरूळ विभागातही सहा.आयुक्त श्री.जयंत जावडेकर व स्वच्छता अधिकारी श्री.अरूण पाटील यांच्या नियंत्रणाखाली स्वच्छताकर्मी आणि मंदिर ट्रस्टचे सदस्य व नागरिक यांच्या एकत्रित सहभागातून गावदेवी मंदिर नेरूळगाव व श्रीदत्त मंदिर सेक्टर 15 परिसराची स्वच्छता करण्यात आली. तुर्भे विभागात सहा.आयुक्त श्री.सागर मोरे व स्वच्छता अधिकारी श्री. जयेश पाटील यांच्या नियोजनानुसार दत्त मंदीर सानपाटा येथे सखोल स्वच्छता करण्यात आली.

            कोपरखैरणे विभागाचे सहा.आयुक्त श्री. भरत धांडे व स्वच्छता अधिकारी यांच्या माध्यमातून स्वच्छताकर्मी व नागरिकांच्या सहयोगाने पावणेश्वर मंदिर व परिसर साफ करण्यात आले. घणसोली विभागाचे सहा.आयुक्त श्री.उत्तम खरात व स्वच्छता अधिकारी श्री.विजय पडघन यांच्या पुढाकारातून पंचशीलनगर रबाळे येथील श्रीराममंदीर व परिसरात प्रभावीपणे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. दिघा येथे सहा.आयुक्त श्री.नैनेश बदले व स्वच्छता अधिकारी श्री.प्रवीण थोरात यांच्यामार्फत कन्हैय्यानगर येथील दुर्गामाता मंदीर व परिसर स्वच्छताकर्मी आणि नागरिकांच्या एकत्रित सहयोगातून स्वच्छ करण्यात आला.

            अशाप्रकारे सर्वच विभागांमध्ये धार्मिक स्थळांची व त्या भोवतालच्या परिसराची सखोल स्वच्छता करून स्वच्छता ही सेवा अभियानातील हा उपक्रम देखील लोकसहभागातून यशस्वी करण्यात आला.

000000

संबंधित पोस्ट

मुंब्रा व दिवा परिसरात अनधिकृत पाणी जोडण्यांविरुद्ध महापालिकेची विशेष मोहिम…

विधान परिषद लक्षवेधी सूचना :चित्रपटांना सेन्सॉर करण्याचे अधिकार केंद्र शासनास- सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार

रायगडमध्ये 14 फेब्रुवारीला शासकीय योजनांचा महामेळावा- विधी सेवा शिबिर, एकाच छताखाली सर्व सेवा उपलब्ध

vishwatmaklokswamivarta

माओवादविरोधी अभियानात उल्लेखनीय कामगिरी, शौर्य आणि कर्तव्यनिष्ठ सेवेमुळे गडचिरोली पोलीस दलातील ५ सहाय्यक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षक पदावर वेगवर्धित पदोन्नती प्रदान

विशेष लेख :-सरदार वल्लभभाई पटेल यांची १५० वी जयंती‘राष्ट्रीय एकता दिवस’ विशेष स्वरूपात साजरा होणार !

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील जीएसबी सेवा मंडळ किंग सर्कल येथील:- गणपती बाप्पाचे विराट दर्शन, गणेश उत्सव सोहळा थेट पहा-:- लाईव्ह प्रक्षेपण-https://vishwatmaklokswamivarta.com/  “विश्वात्मक लोकस्वामी वार्ता वेब पोर्टलवर २७-३१ ऑगस्ट २०२५ दरम्यान गणेशोत्सव साजरा… सर्व देशवासीयांना गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा