vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मराठवाड्यातील अतिवृष्टीचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा मराठवाड्यातील प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून साधला संवाद

मराठवाड्यातील अतिवृष्टीचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा मराठवाड्यातील प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून साधला संवाद..

राज्य प्रतिनिधी

राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाला तातडीने मदत पुरवण्याचे, पुराच्या वेढ्यात अडकलेल्या नागरिकांची त्वरित सुटका करण्याचे निर्देश- मराठवाड्यातील अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लक्ष ठेवून असून, मराठवाड्यातील प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद साधून त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. पुराच्या पाण्यात अडकून पडलेल्या नागरिकांना तातडीने मदत करून सुरक्षितस्थळी हलविण्याचे निर्देश त्यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले. तसेच उपमुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिव, आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या प्रधान सचिव व संचालकांशी बोलून त्यांना सूचनाही दिल्या.

मराठवाड्यात सर्वत्र अतिवृष्टी झाल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पूर परिस्थितीचा आढावा घेऊन लोकांना तत्काळ मदत पुरवण्याचे निर्देश दिले आहेत. यावेळी बीड, धाराशिव, लातूर, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला.

दरमान धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील ढगपिंपरी गावातील नागरिक पूर परिस्थितीत अडकल्याचे त्यांना समजले. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी जिल्ह्याधिकाऱ्यांशी बोलून तत्काळ एनडीआरएफच्या मदतीने हेलिकॉप्टर पाठवून पुराच्या वेढ्यात अडकलेल्या नागरिकांना तातडीने एअरलिफ्ट करून सुरक्षितस्थळी नेण्याचे निर्देश दिले. तसेच कोणतीही मदत लागल्यास तत्काळ आपल्याशी संपर्क साधावा आणि वेळोवेळी पूर परिस्थितीची माहिती आपल्याला द्यावी असेही संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले.

0000

संबंधित पोस्ट

रक्षामंत्र्यांनी स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा यांना प्रादेशिक सैन्यात लेफ्टनंट कर्नलच्या मानद दर्जाचे सन्मान चिन्ह केले प्रदान लेफ्टनंट कर्नल (मानद) नीरज चोप्रा हे चिकाटी, देशभक्ती आणि उत्कृष्टतेसाठी प्रयत्नशील असलेल्या भारतीय भावनेचे प्रतीक: राजनाथ सिंह

vishwatmaklokswamivarta

मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकालगतच्या पुलाचे नामकरण पुण्यश्लोक राजमाताअहिल्यादेवी होळकर असे करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस• गतीसह गुणवत्तने विकासकामे पूर्ण करण्यास राज्य शासनाचे प्राधान्य• मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाच्या पुनर्बांधणी कामाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण-    महानगरपालिकेद्वारे विहित मुदतीच्या आत पुलाचे काम पूर्ण

जप्त व बेवारस वाहनांचा १२ एप्रिल रोजी लिलाव

श्री सिद्धिविनायक मंदिरातील वस्त्रसंहिता योग्यच!पंतप्रधानही वस्त्रसंहितेचे पालन करतात; सरकारीकरण झालेल्या सर्वच मंदिरात वस्त्रसांहिता लागू करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघ

vishwatmaklokswamivarta

शिक्षक मतदार नोंदणीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 6 नोव्हेंबरपर्यंतमतदार नोंदणीसाठी अर्जाची ऑनलाईन सुविधा उपलब्ध

vishwatmaklokswamivarta

समाजमाध्यमांद्वारे ग्राहकांच्या हक्कांची व अधिकारांची जनजागृती करा – अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने

vishwatmaklokswamivarta