vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांनी अतिवृष्टीग्रस्त भागाची केली पाहणी

पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांनी अतिवृष्टीग्रस्त भागाची केली पाहणी

बुलडाणा, प्रतिनिधी): राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.मकरंद पाटील यांनी आज तालुक्यातील नळकुंड, मलकापूर तालुक्यातील दाताळा, जांबुळ धाबा येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जावून पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर दिला.

नैसर्गिक आपत्तीच्या संकटात सापडेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य शासन खंबीरपणे उभे आहे. मागील जून ते ऑगस्ट महिन्यातील अवेळी पाऊस आणि अतिवृष्टीची नुकसान भरपाई वितरित केली जात आहे. सप्टेंबर महिन्यात गेल्या काही दिवसात झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण करुन घ्यावे. नदीजकवळील खरडून गेल्या जमिनी व वाहून गेलेल्या शेतीपूरक साहित्य, जनावरे आणि पडझड झालेल्या घरांची नोंद करुन घ्यावी.आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याची कार्यवाही करण्यात येईल. शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही आहोत, असे आश्वस्त करत पालकमंत्री ना. पाटील यांनी शेतकऱ्यांना धीर दिला.

यावेळी आमदार चैनसुख संचेती, आमदार संजय गायकवाड, आमदार मनोज कायंदे, जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे, शरद पाटील, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मनोज ढगे, तहसिलदार, तालुका कृषी अधिकारी, तलाठी आदी अधिकारी व कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

 

०००

संबंधित पोस्ट

महापालिका, नगर परिषद व नगर पंचायती क्षेत्रात‘कर मुल्यांकनासाठी’ विशेष मोहीम राबविणार   – जिल्हाधिकारी आशिमा मित्तल …

vishwatmaklokswamivarta

जलसंपदा विभागाचा ‘रिपोर्ट कार्ड’ मुख्यमंत्र्यांना सादर अहवाल देणारे विखे पाटील ठरले पहिले मंत्री

अल्पसंख्याक समाजापर्यंत शासनाच्या योजना पोहोचवा- ललित गांधीजैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष यांनी घेतला विविध विषयाचा आढावा…

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या लाभार्थींची मंगळवारी निवडजिल्हाधिकारी कार्यालयातील कार्यक्रमास उपस्थितीचे

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा-१जिल्ह्यात मार्च व एप्रिल महिन्यात मंडळस्तरावर शिबिरांचे आयोजन

ग्रामीण युवकांसाठी सुवर्णसंधी: जिल्ह्यात 5 कौशल्य विकास केंद्रप्रशिक्षण संस्थांकडून 17 ऑक्टोबरपूर्वी प्रस्ताव आमंत्रित

vishwatmaklokswamivarta