vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पावसाच्या रेड अर्लटच्या पार्श्वभुमीवर माजी नगराध्यक्ष भास्करराव अंबेकर यांच्याकडून जालना शहरवासियांना सतर्कतेचे आवाहन-दोन ऑटोरिक्षावर भोंगे लावून नागरिकांना केले आवाहन

पावसाच्या रेड अर्लटच्या पार्श्वभुमीवर माजी नगराध्यक्ष भास्करराव अंबेकर यांच्याकडून जालना शहरवासियांना सतर्कतेचे आवाहन-दोन ऑटोरिक्षावर भोंगे लावून नागरिकांना केले आवाहन

जालना, द(प्रतिनिधी)- मागील काही दिवसांपासून जिल्हाभर प्रचंड मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होवून जिल्ह्यासह जालना शहरातील नागरिकांचे जनजीवन अत्यंत विस्कळीत झाले आहे. अशी परिस्थिती असतांना आज २७ सप्टेंबर रोजी पुन्हा हवामान खाते व प्रशासनाच्या वतीने पुढील दोन दिवसांसाठी अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला. या पार्श्वभुमीवर शिवसेना (उध्दवबाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष भास्कररावअंबेकर यांनी जनतेच्या काळजीपोटी नागरिकांना अतिवृष्टीपासून सतर्क करण्यासाठी जालना शहरात दोन ऑटोरिक्षावर भोंगे लावून नागरिकांना खबरदारीच्या सुचना दिल्या. शिवसेना जिल्हाप्रमुख अंबेकर हे सातत्याने वेगवेगळ्या अडीअडचणीच्या प्रसंगी नागरिकांना मदत करत असतात. दोन दिवसांपूर्वीच शहरातील अनेक बाधितवस्त्यांमध्ये अन्नधान्यांच्या किट वाटप त्यापुर्वी पुरीभाजी वाटप,

अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप असेउपक्रम राबवून नागरिकांना दिलासा देण्याचे काम करीत आहे. कोरोना काळातहीजिल्हाप्रमुख अंबेकर यांनी दोन ऑटो रिक्षांना भोंगे लावून शहरातीलनागरिकांना घाबरुन न जाता सुरक्षेतच्या संदर्भात काळजी घेण्याचे आवाहन केले होते.

०००००००फोटो ओळी……७-पावसाच्या रेड अर्लटच्या पार्श्वभुमीवर शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांच्याकडून दोन ऑटोरिक्षावर भोंगे लावून अतिवृष्टीसंदर्भात जालना शहरवासियांना सतर्कतेचे आवाहन केले.

०००००००००००

संबंधित पोस्ट

जिल्ह्यातील १ लाख ४० हजार शेतक-यांनी डाउनलोड केले महाविस्तार AI अप कराड तालुका राज्यात प्रथम ३०,००० शेतक-यांनी केले ॲप डाउनलोड*

जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते पादत्राणे व्यावसायिकांना गटई स्टॉल चे वाटप

अ‍ॅडव्हांटेज विदर्भ महोत्सवामुळे विदर्भ क्षेत्र उद्योगाच्या केंद्रस्थानी येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘अ‍ॅडव्हांटेज विदर्भ 2025- खासदार औद्योगिक महोत्सवा’चे थाटात उद्घाटनमुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने विदर्भ विकासाला गती – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

vishwatmaklokswamivarta

विशेष – दुष्काळाकडून जल समृद्धीकडे किरकसाल गावची वाटचाल…

vishwatmaklokswamivarta

नगरपरिषद/नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 इलेक्ट्रॉनिक, सोशल मीडियातील प्रचाराच्या राजकीय जाहिरातींचे प्रमाणिकरण बंधनकारक      – जिल्हाधिकारी अशोक काकडे

vishwatmaklokswamivarta

दावा न केलेली रक्कम खातेदारांना देण्यासाठी बँकांनी जनजागृती करावी- जिल्हाधिकारी अशोक काकडे- दावा न केलेली रक्कम खातेदारांना परत देण्यासाठी महामेळावा संपन्न- ⁠आतापर्यंत ३३४ खातेदारांना ३९ लाखांचा लाभ..

vishwatmaklokswamivarta