vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यातून 68 उमेदवारांची निवड

पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यातून 68 उमेदवारांची निवड

            जालना प्रतिनिधी) :- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना व मातोश्री स्क‍िल डेव्हलमेंट सेंटर, जालना यांचे संयुक्त विद्यमाने मंगळवार दि. 30 सप्टेंबर, 2025, रोजी मातोश्री स्क‍िल डेव्हलमेंट सेंटर, मातोश्री लॉन्स, अंबड रोड, जालना येथे “पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा” संपन्न झाला असून सदर मेळाव्यामध्ये 68 उमेदवारांना विविध कंपन्यामध्ये रोजगारची संधी प्राप्त झाली आहे.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडून दि. 30 सप्टेंबर, 2025, रोजी बेरोजगार उमेदवारांसाठी जालना येथील मातोश्री स्क‍िल डेव्हलमेंट सेंटर, मातोश्री लॉंन्स, अंबड रोड, जालना मध्ये “पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे” आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे उद्घाटन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकताचे सहायक आयुक्त गणेश चिमणकर यांच्या हस्ते झाले. प्रमुख उपस्थितीत मातोश्री स्क‍िल डेव्हलमेंट सेंटरचे संचालक ओंकार अर्दड हे होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मार्गदर्शन अधिकारी भुजंग रिठे यांनी केले.

या रोजगार मेळाव्यात विविध नामांकित कपन्यांचे प्रतीनिधी सहभागी झाले होते. यामध्ये 220 उमेदवारांनी सहभाग नोंदविला असून विविध उद्योजकाकडे मुलाखती दिल्या. त्यापैकि 176 पुरुष आणि 44 स्त्री उमेदवारांची सदर आस्थापनानी प्राथमिक निवड केली. मातोश्री स्किल डेव्हलपमेंट सेंटर प्रा. लि. जालना यांनी 2, पेटीएम सर्विसेस प्रा. लि. जालना यांनी 20, आई इन्शुरन्स & इन्वेस्टमेंट सर्विसेस यांनी 11, भारत फाइनेंशियल सर्विसेस लिमिटेड जालना यांनी 11, टाटा मोटर्स लिमिटेड पुणे यांनी 6, बजाज ऑटो लिमिटेड छत्रपती संभाजीनगर यांनी 6, धूत ट्रान्समिशन प्रा. लि. छत्रपती संभाजीनगर यांनी 5, रेडिको खेतान लिमिटेड छत्रपती संभाजीनगर यांनी 7, अशी एकुण 68 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे.

या रोजगार मेळाव्यात सूत्रसंचलन डॉ. अमोल परिहार यांनी तर आभार प्रदर्शन कैलास काळे, यांनी केले. रोजगार मेळावा यशस्वी करण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन कार्यलयाचे अमोल बोरकर, आत्माराम दळवी, प्रदिप डोळे, विशाल जगरवाल, रविंद्र पाडमुख, अमर तुपे, दीपक पालवे, मातोश्री स्क‍िल डेव्हलमेंट सेंटरचे प्रकाश उघडे व इतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

मौजे सोमनाथ (ज.) ता.जालना येथील सुरेश एखंडे यांचाभाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृह; प्रवेश प्रक्रिया सुरु

अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी आवश्यक निधी मिळवण्यासाठी प्रयत्नशील- सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

थकीत कर्जाचा एक रकमी भरणा केल्यास व्याजात मिळणार 50 टक्के सवलत

vishwatmaklokswamivarta

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची बीज भांडवल कर्ज योजना; अर्ज मागविले

सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न समन्वयातून सोडविणार – मंत्री मकरंद जाधव-पाटील