vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेअंतर्गत जमीन विक्रेत्यांनी संपर्क साधावा

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेअंतर्गत जमीन विक्रेत्यांनी संपर्क साधावा

सातारा प्रतिनिधी:अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना राबविण्यात येते. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय दिनांक 14 ऑगस्ट 2018 अन्वये सदर योजन अंतर्गत पात्र लाभार्थ्यांस जमिन उपलब्ध करुन देणेच्या अनुषंगाने जमिन विकत घेण्याकरीता जिरायती जमिनी करीता प्रती एकर रूपये पाच लाख आणि बागायती जमीनीकरीता प्रती एकर रूपये आठ लाख इतकी कमाल मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. सदर नमूद दरास अनुसरून जी व्यक्ती या योजनतंर्गत जमीन विक्री करण्यास तयार आहे. त्यांनी खालील अटी व शर्तीस अनुसरून जमीन विक्री बाबतचे प्रस्ताव या कार्यालयास सादर करण्यात यावेत.

सदर जमिन पीक लागवडीच्या दृष्टीने सुपिक असावी, सदर जमिनीबाबत कोणताही स्थानिक अथवा न्यायालयीन वाद नसावा, सदर जमीनीवर कोणत्याही स्थानिक वित्तीय संस्था उदा. बँक / पतसंस्था / विकास सोसायटी यांचा बोजा नसावा, सदरची जमीन कसन्यास अयोग्य, डोंगर उताराची, खडकाळ, व नदी पात्रा जवळची क्षारयुक्त व क्षारपाड जमिन नसावी, सदर जमीनीस पोहच रस्ता असावा.

तरी, या अटी व शर्तीस अनुसरून जमीन विक्री करावयास इच्छुक असणाऱ्या व्यक्तींनी परीपूर्ण प्रस्ताव सादर करावा असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण सुनिल जाधव, सातारा यांनी केले आहे. संपर्कासाठी पत्ता- सहायक आयुक्त, समाज कल्याण, सातारा कार्यालय, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा 415003

00000

संबंधित पोस्ट

ताणतणाव व्यवस्थापन आणि सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम*

vishwatmaklokswamivarta

बुलढाणा जिल्हा गुंतवणूक परिषद मंगळवारी- गुंतवणूकदार, उद्योजकांना सहभागी होण्याचे आवाहन- सामंजस्य करार करण्याची संधी

आपत्ती व्यवस्थापनासाठी 300 आपदा मित्रांची प्रशिक्षणासाठी निवड होणार-> इच्छुक युवकयुवतींना नाव नोंदणी करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

ऑडीची एसयुव्ही-एसयुव्हीची पुढील आवृत्ती भारतीय बाजारात सादर

vishwatmaklokswamivarta

राज्यासह विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा…

vishwatmaklokswamivarta

ऑटोरिक्षा, मीटर्ड टॅक्सी चालकांनी अर्ज करण्याचे आवाहन