vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक शून्य अपघाती मृत्यूचे लक्ष्य गाठण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक शून्य अपघाती मृत्यूचे लक्ष्य गाठण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी बघतोय विचारा बाळ आणि तो आपला भाव काय लागल्या दुसरी घेऊन येईन मी त्याच्यासाठी- भारत सरकारच्या रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्रालयाने ‘शून्य अपघाती मृत्यू जिल्हा’ या उपक्रमासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची निवड केली आहे. जिल्ह्यात रस्त्यावर होणाऱ्या अपघातांमध्ये मृत्यूदर शून्यावर आणण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी प्रभावी उपाययोजना राबवाव्या, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.

रस्ते अपघातात सर्वाधिक मृत्यू होत असलेल्या देशातील १०० जिल्ह्यांची निवड भारत सरकारच्या रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्रालयामार्फत एका सर्व्हेक्षणाद्वारे करण्यात आली आहे. या जिल्ह्यात रस्ते अपघातातील मृत्यूचे प्रमाण शून्यावर आणण्याचे लक्ष्य देण्यात आले आहे. त्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा समावेश आहे. त्याअनुषंगाने आज जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली.

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे, पोलीस उपायुक्त वाहतुक शर्मिष्ठा वालावलकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश लढ्ढा, अधीक्षक अभियंता एस.एस. भगत, कार्यकारी अभियंता शेषराव चव्हाण तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत माहिती देण्यात आली की, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २०२४ मध्ये ३७३ अपघात झाले त्यात ४६८ मृत्यू झाले. तसेच सन २०२५ मध्ये ४०३ अपघातात ५०८ जणांचे मृत्यू झाले, अशी आकडेवारी सेव्ह लाईफ फाऊंडेशन या संस्थेने सर्व्हेक्षण करुन दिली आहे. अपघात टाळता यावे यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे व अपघातानंतर जखमींना तात्काळ उपचार सुविधा उपलब्ध करण्यासाठी उपाययोजना राबविण्याचे बैठकीत निश्चित करण्यात आले. त्यात अपघात प्रवण स्थळे निश्चित करुन तेथे रस्ते सुरक्षा उपाययोजना राबविणे, आपत्कालिन परिस्थितीत जखमींना उपचार सुविधा देण्यासाठी लागणारा कालावधी कमी करणे, वाहन चालवितांना वाहन चालकांकडून होणाऱ्या नियमभंगांविरुद्ध कारवाई करणे याबाबत चर्चा करण्यात आली.

 रस्ते अपघातात मृत्यू होण्याची प्रमुख कारणे- हेल्मेट, सीट बेल्ट न वापरणे, अति वेगात वाहन चालविणे, मद्यपान/ नशापान करुन वाहन चालविणे, वाहन चालकांचे आरोग्य नीट नसणे (दृष्टीदोष वगैरे), वाहन सदोष/ नादुरुस्त असणे, वाहन चालवितांना मोबाईल वापरणे, जादा भार असणे, वाहनांना दिवे प्रखर असणे, रिफ्लेक्टर्स नसणे वा सदोस असणे, इ. प्रमुख कारणे देण्यात आली आहेत.

जिल्ह्यात एकूण ६६ अपघातप्रवण स्थळे आहेत. या स्थळांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना जसे आवश्यक अभियांत्रिकी बदल, सुचना, दिशा फलक लावणे, नजिकच्या ठिकाणी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करणे इ. उपाययोजना राबविण्यासाठी ९ कोटी रुपयांचा आराखडाही परिवहन विभागाने आज सादर केला.

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले की, रस्ते अपघातात होणारे मृत्यूचे प्रमाण अधिक असणे ही बाब जिल्ह्यासाठी भूषणावह नाही. रस्ते अपघातात होणाऱ्या मृत्यूंचे दर कमी करुन ते प्रमाण शून्यावर आणण्यासाठी संबंधित प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी चोख पार पाडावी. त्यानुसार उपाययोजना राबवाव्या. वाहन चालक हा यातील सर्वात महत्त्वाचा घटक असून त्यांच्या आरोग्य तपासणीपासून, समुपदेशनापर्यंत उपाययोजना राबवाव्या. दिवाळीच्या सुटीत स्कुल बसच्या वाहन चालकांची आरोग्य तपासणी करुन घ्यावी. अन्य ट्रक व बसेस चालकांचीही आरोग्य तपासणी व समुपदेशन गटागटाने करण्यात यावे. अपघातप्रवण क्षेत्राच्या दोन्ही बाजूला ठराविक अंतराने सुचना फलक लावावे. अपघातप्रवण स्थळांच्या जवळ रुग्णवाहिका व वैद्यकीय सुविधांची उपलब्धता ठेवणे, जनजागृती करणे अशा उपाययोजना राबवाव्या,असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले.

०००००

संबंधित पोस्ट

गरीबशाह बाजार येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर

राज्यात जोमदार पाऊस पडूदे आणि बळीराजा सुखी, समाधानी होऊदे – मुख्यमंत्री अजित पवार यांचे गणपतीकडे मागणे..

vishwatmaklokswamivarta

भूमिहीन दारिद्र्य रेषेखालील आदिवासींचे सबलीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत”जमीन विक्रीसाठी इच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन

केरळ येथे रिक्षा चालकाने जिंकली 25 कोटी रुपयांची ओणम बंपर लॉटरी

vishwatmaklokswamivarta

देशाचा समृद्धीसाठी विद्यार्थ्यांची बौद्धीक क्षमता वाढवावी – राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे