vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी शासनाचा दिलासा;परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णयशैक्षणिक संस्थांनी पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मदतीसाठी पुढे यावे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे आवाहन

पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी शासनाचा दिलासा;परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णयशैक्षणिक संस्थांनी पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मदतीसाठी पुढे यावे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे आवाहन

मुंबई, प्रतिनिधी: राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस झाला आहे. पुरामुळे कागदपत्रे, शैक्षणिक साहित्य वाहून गेलेल्या एकाही विद्यार्थ्याचे शिक्षण बाधित होणार नाही, याची दक्षता घेतली जात असून परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सोबतच शैक्षणिक संस्थांनीही सामाजिक जबाबदारी म्हणून विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले आहे.

मंत्रालयात राज्यातील पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणींचा आढावा घेण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीला उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, उपसचिव प्रताप लुबाळ, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. अजय भामरे, तसेच राज्यातील विविध महाविद्यालयांचे प्राचार्य आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, अनेक विद्यार्थ्यांचे साहित्य आणि शैक्षणिक साधने पुरामुळे नष्ट झाली आहेत. त्यामुळे महाविद्यालये, विद्यापीठे आणि खासगी शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, गणवेश अशा स्वरूपात सामाजिक कर्तव्य म्हणून मदत करावी. यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल आणि त्यांचे शिक्षण अखंडितपणे सुरू राहील.

 

0000

संबंधित पोस्ट

गडचिरोली येथील क्रांतीवीर बाबुराव शेडमाके शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (#आयटीआय) येथे राबविण्यात आलेल्या ‘ट्रॅक्टर सर्विस मेकॅनिक’ या अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमातून प्रशिक्षण पूर्ण केलेल्या २५ विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्रांचे वाटप

महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणुकीसाठी २६ एप्रिल २०२६ रोजी मतदान-सातारा जिल्हा प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना जाहीर

महिला बचत गटांच्या उत्पादनांसाठी १० जिल्ह्यांमध्ये ‘उमेद मॉल’ग्रामीण महिलांच्या सबळीकरणासाठी महत्त्वाचे पाऊल, २०० कोटींचा निधी

राज्यातील गड किल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्यासाठी व अतिक्रमणे रोखण्यासाठी जिल्हास्तरीय कमिटी – सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार

vishwatmaklokswamivarta

व्यसन दुष्परिणामाबाबत प्रत्येक शाळेत20 फेब्रुवारी, 11 मार्चला परिपाठ – जिल्हाधिकारी अशोक काकडे- व्यसन दुष्परिणाम परिपाठामध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा- व्यसनमुक्तीसाठी सक्रिय योगदान देण्याचे आवाहन- तंबाखूजन्य व प्रतिबंधित पदार्थांची विक्री रोखण्यासाठी दक्ष राहा…

vishwatmaklokswamivarta

हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन• *नागरिकांनी सोशल मीडियावर या कार्यक्रमाशी संबंधीत पोस्ट करण्याचे आवाहन*• *शालेय विद्यार्थ्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन*

vishwatmaklokswamivarta