vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली ।

राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली ।

मुंबई प्रतिनिधी

मुंबई मराठी पत्रकार संघ या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षा तफै श्री. काशिनाथ साधू शेवते प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य , श्री. ज्ञानेश्वर सलगर- मुख्य महासचिव, महाराष्ट्र राज्य.डॉ. तौसिफ शेख – उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य,श्री. अजित पाटील – सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य तसेच इतर मान्यवर या कार्यक्रमात सहभागी होते. श्री. काशिनाथ साधू शेवते यांनी पत्रकार आणि मीडिया यांच्याशी संवाद साधताना,राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत,राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे माजी मंत्री महादेव जानकर साहेब यांच्या समवेत राष्ट्रीय समाज पक्षाच्या राज्य कमिटीने स्थानिक पदाधिकाऱ्यांसह राज्याचा दौरा करत पुरग्रस्त व अतिवृष्टीग्रस्त यवतमाळ, अकोला, बुलढाणा, अमरावती, नांदेड, हिंगोली, परभणी, वाशिम, बीड, धाराशिव, नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, पुणे, सातारा, सांगली, छत्रपती संभाजी नगर अश्या अनेक जिल्हयाच्या पाहणीनंतर मोठया प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या मागणीनुसार राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार तसेच कृषी मंत्री यांची भेट घेतली आहे१) ज्या कुटुंबाची कायमची घरे पूर्णपणे उध्दवस्त झाली आहेत त्यांना १० लक्ष रुपये आणि ज्यांची कच्ची घरे उध्दवस्त झाली आहेत त्यांना रु. ५ लक्ष रुपये मंजूर करण्यात यावी.२) पुरामुळे शेतकऱ्यांना झालेल्या पिकाच्या नुकसानीची भरपाई कोणत्याही पंचनामा किंवा इतर औपचारिकतेशिवाय, त्यांच्या शेतजमिनीच्या आकारानुसार प्रति एकर ५० हजार रुपये या दराने थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करावी.

३) पुरात वाहून गेलेल्या घरगुती वस्तूंची यादी जसे की, रेशन, गॅस स्टोव्ह, कपाट, टिव्ही, रेफ्रिजरेटर, कुलर, सोफा सेट, संगणक, वाहने, किराणा सामान आणि इतर वस्तूंची यादी तयार करावी आणि योग्य भरपाई द्यावी.४) शाळेत जाणाऱ्या मुलांना मोफत शालेय शुल्क, नोटबुक, गणवेश आणि बॅग्ज देण्यात याव्यात. जेणकरून त्यांचे शिक्षण खंडीत होऊ नये.

५) पुराच्या पाण्याचे पशुधन म्हैस, गाय, शेळी, मेंढी असे जनावरे मृत्यूमुखी पडल्यामुळे त्यांना बाजारभावाप्रमाणे मोबदला देण्यात यावा आणि ५ फुट पर्यंतची सुपीक माती वाहून गेली आहे. त्याचे सर्वेक्षण करून योग्य भरपाई द्यावी.

६) पुरग्रस्त कुटुंबाना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करून दिर्घकालीन पुनर्वसन योजना विकसीत करावी.७) बँकेने, फायनान्स कंपनीने वाहन कर्ज व इतर कर्जाची सक्तीची वसूली करू नये.८) छोटया व्यापाऱ्यांचे जे नुकसान झाले आहे त्यांना विशेष निधी देण्यात यावा.या भयानक पुर दुर्घटनेते बाधित राज्यातील सर्व शेतकरी आणि सामान्य नाकरीकांना मदत करण्यासाठी त्वरीत आणि प्रभावी निर्णय घ्यावा, अशी मागणी आम्ही पक्षाच्या वतीने केलेली होती. परंतु राज्य सरकारने अतिशय तुटपुंजी मदत जाहीर करत शेतकऱ्यांच्या तोंडाला फक्त पाने पुसण्याचे काम केले आहे जर राज्यसरकारने आमच्या मागणी कडे लक्ष दिले नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असे काशिनाथ साधू शेवते तसेच इतर मान्यवरांनी पत्रकार आणि मीडिया यांच्याशी संवाद साधला.

संबंधित पोस्ट

ग्रामोद्योग भरारी पुरस्कार-2026 करिता इच्छुक उद्योजकांनी अर्ज सादर करावेत

नवी मुंबई महानगरपालिकेस पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल ‘हरित यशोगाथा सर्वांगीण उत्कृष्टता’ पुरस्कार*

vishwatmaklokswamivarta

पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी पर्यटन पोलीस नेमणार पर्यटन प्रकल्प गतीने पूर्ण करावे- मुख्यमंत्री आगामी शंभर दिवसात पर्यटन विभागाने करावयाच्या कामकाजाचा घेतला आढावा

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र विधानसभेच्या निर्वाचित सदस्यांकडून सात सदस्यांची राज्यसभेसाठी द्विवार्षिक #निवडणूक घेण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. याबाबतची अधिसूचना महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाकडून प्रसिद्ध

सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची संधी

vishwatmaklokswamivarta

महसूल गुप्तचर संचालनालयाने ऑपरेशन व्हाईट कॉलड्रॉन अंतर्गत वलसाड येथील अल्प्राझोलम बनवणारा कारखाना उध्वस्त करून बहु-राज्यीय ड्रग्ज नेटवर्क आणले उघडकीला ; 22 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त; चार जणांना अटक

vishwatmaklokswamivarta