vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याराजकारणस्थानिक बातम्या

शिवसेना नेते रामदास कदम यांनी आज पत्रकार परिषदेत महत्वाचे विविध मुद्द्यांवर भाष्य केले.

शिवसेना नेते रामदास कदम यांनी आज पत्रकार परिषदेत महत्वाचे विविध मुद्द्यांवर भाष्य केले.

मुंबई प्रतिनिधी-शिवसेना आमदार रामदास कदम यांनी आज पत्रकार परिषदेत त उभाटा शिवसेना नेते अनिल परब यांच्यावर जोरदार टीका केली आणि त्यांनी केलेले आरोपावर प्रतिउत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे रामदास कदम यावेळी पत्रकार परिषदेत म्हणाले की गेल्या तीन वर्षापासून माझा मुलगा योगेश कदम याला टार्गेट करण्यात येत आहे आज पर्यंत आम्ही कोणत्याही खोटे काम केलेले नाही आणि आम्ही करतही नाही परंतु अनिल परब उभाटा नेते मात्र खोटे बोलत आहेत अनेक बिल्डरच्या प्रकरणात त्यांनी अनेक रहिवाशांना दमदाटी केलेल्या आहेत आणि बिल्डरला सहकार्य केलेले आहे आठ हजार मराठी लोकांना त्याचा नाहक फटका बसलेला आहे अनिल परब यांनी बिल्डर याच्याशी साठ गाठ करून प्रेम नगर येथील रहिवाशांची घरे खाली केली आहे केली असे मला ते म्हणाले की

 शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर त्यांचं पार्थिव मातोश्रीमध्ये दोन दिवस ठेवलं गेलं आणि त्यांच्या हाताचे ठसे घेण्यात आले, असा गंभीर आरोप रामदास कदम यांनी केला होता. मात्र, या वक्तव्यामुळे शिवसेना शिंदे गट अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता रामदास कदम यांना स्वतःचेच शब्द गिळण्याची वेळ आल्याचे दिसून येत आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची बदनामी होईल, असे कुठलेही वक्तव्य मला करायचे नाही. बाळासाहेब आमचे दैवत आहेत. उद्धव ठाकरेंनी मला सांगितले होते की हाताचे ठसे…. आपण घेतो ना. छत्रपती शिवाजी महाराजांचे देखील पायाचे ठसे घेतलेले आहेत. तसेच आमचे दैवत म्हणून बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतले असतील तर त्यात वाईट काय? परंतु त्यांना (अनिल परब) असे वाटते की, मी स्वीस बँकेसाठी ते बोललो आहे. बाळासाहेबांच्या बाबतीत असे घाणेरडे विचार आमच्या मनात कदापि येणार नाहीत. मी फक्त संशय व्यक्त केला होता. संपला विषय माझा. बाळासाहेबांची बदनामी होईल, असे कुठलेही वक्तव्य माझ्याकडून होणार नाही, आमचे ते दैवत आहे, असे म्हणत रामदास कदम यांनी माघार घेतली. असे यावेळी पत्रकार परिषदेत ते म्हणाले

 दरम्यान सचिन घायवळ याला शस्त्र परवाना देण्यावरून देखील परब यांनी योगेश कदम यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता, त्याला देखील कदम यांनी यावेळी उत्तर दिलं आहे. गृह राज्यमंत्र्याला अधिकार असतात, जर एखाद्या व्यक्तीवर एकही गुन्हा नाही, त्याच्यावर कोर्टात कोणतीही केस नाही, तर गृहराज्यमंत्री तसा निर्णय घेऊ शकतात. तुम्हाला विचारून निर्णय घ्यायचे का? असा सवाल यांनी कदम यांनी केला. दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, आणखी एक गोष्ट मी तुम्हाला मुद्दामहून सांगतोय, मला जास्त खोलात जायचं नाही. मी योगेश कदम यांना विचारलं, त्यांनी लायन्सबाबत जो निर्णय घेतला आहे, तो एका मोठ्या पदावर बसलेल्या विधानसभेत, विधिमंडळांत मंत्र्यांना देखील आदेश देणाऱ्या अशा व्यक्तीनं त्यांना सांगितलं आहे. तो व्यक्ती देखील न्यायाधीशच आहे, त्यांनी योगेश कदम यांना सांगितलं, आणि म्हणून योगेश कदम यांनी हा निर्णय घेतला आहे. योगेश कदम यांनी त्या व्यक्तीचं नाव मुख्यमंत्र्यांना पाठवलं आहे

00000

संबंधित पोस्ट

विजेच्या स्मार्ट पोस्टपेड मीटरच्या माध्यमातूनसौर तासामध्ये वीज वापरावर बिलात १० टक्के सवलत- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,तीन दिवसीय विदर्भ पाणी परिषदेस प्रारंभ   बळीराजा योजना अंतर्गत 20 हजार गावांचे बदलले चित्रतापी पुनर्भरण व वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प देईल शेतीला शाश्वत पाणी..

७ डिसेंबर रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये संविधान जनजागरण परिषदेचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

सायन सर्कल येथे भीषण अपघात – सिमेंट मिक्सरची गाडी पलटी

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र एसएससी परीक्षा 2025: मुख्य तारखा आणि तपशील हॉल तिकीट जाहीर…

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या  दौऱ्यावर बँकॉकला पोहोचले