vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेविषयी आवाहन

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेविषयी आवाहन

जालना, प्रतिनिधी :- महिला व बालविकास विभागाअंतर्गत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, जालना या कार्यालयाकडुन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना राबविण्यात येते. योजनेअंतर्गत अनाथ, निराधार, एकल पालक, दुर्धर आजाराने बाधीत पालकांची बालके, कैद्यांची मुले, दिव्यांग बालके, अंध, मतीमंद, बालके यांना सदर योजनेअंतर्गत बाल कल्याण समितीच्या शिफारसीनुसार 2 हजार 250 रुपये दरमहा लाभ दिला जातो. अर्जदाराने अर्ज त्रयस्थ्‍ा व्यक्तीमार्फत न सादर करता स्वत: जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय जालना प्रशासकीय इमारत तळमजला जालना या ठिकाणी सादर करावा. तसेच सदर योजनेसाठी कार्यालयाकडुन कोणतेही शुल्क आकारण्यात येत नसुन सदर योजना मोफत पुरविण्यात येते.याबाबत कुणाची आर्थिक फसवणुक झाल्यास त्याची जबाबदारी या कार्यालयाची राहणार नाही यांची सर्व संबंधीत लाभार्थींनी नोंद घ्यावी असे अवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

संबंधित पोस्ट

निसर्गाच्या कुशीतून आलेल्या चविष्ट रानभाज्‌यांचा उत्सव – ठाण्यात रानभाज्या महोत्सव उत्साहात संपन्न

आंबा-काजू उत्पादक, मच्छीमार आणि शेतकऱ्यांच्या वेदनांची जाणीव ठेवत वाढदिवस साजरा न करण्याचा मंत्री नितेश राणे यांचा निर्णय

कोलपल्ली नाल्याच्या पुरात अडकलेले ग्रामसेवक उमेश धोडरे यांना जिल्हा प्रशासनाच्या तत्परतेने वाचवले*

vishwatmaklokswamivarta

शिवस्वराज्य दिनी पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांचे‍ छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

प्रगतीशील, विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने वाटचाल- राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन,राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास राज्यपालांच्या अभिभाषणाने सुरूवात

नयना गुंडे यांनी विभागीय आयुक्त पदाचा पदभार स्विकारला