vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

सर्व शाळांमध्ये मराठी भाषा आणि राज्यगीत अनिवार्य

सर्व शाळांमध्ये मराठी भाषा आणि राज्यगीत अनिवार्य..

राज्य प्रतिनिधी-महाराष्ट्राचे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी राज्यातील सर्व शाळांमध्ये आता मराठी भाषा शिकवणे आणि राज्यगीत अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता सीबीएसई, आयसीएसई तसेच केम्ब्रिज आणि आंतरराष्ट्रीय बोर्डातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा शिकणे अनिवार्य असेल. सोबतच ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत देखील अनिर्वाय करण्यात आले आहे. मराठी भाषा शिकवणे आणि राज्यगीत अनिवार्य करण्याचा निर्णय शैक्षणिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्वाचा आहे.

शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी बोर्ड समन्वयक आणि शिक्षण अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेत या निर्णयाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, शाळांमध्ये दररोज राष्ट्रगीत म्हटले जाते. त्याप्रमाणे दररोज राज्यगीत देखील म्हटले जाईल. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बोर्डांतील शाळांमध्ये दहावीच्या गुणपत्रिकेत मराठी विषय असेल. त्यासाठी राज्य सरकार संबंधित बोर्डांशी पत्रव्यवहार करेल.

याशिवाय शिक्षणमंत्र्यांनी आणखी काही बदल सुचवले आहेत. आयसीएसई पाठ्यपुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन आणि कार्यावर आधारित धडे समाविष्ट करावेत. शाळांमध्ये समावेशी शिक्षण, दिव्यांग विद्यार्थ्यांना मदत, प्रत्येक शाळेत सीसीटिव्ही बसवणे आणि शिक्षणाच्या अधिकार कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे या गोष्टींवर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. हे निर्देश अंमलात आणण्यासाठी पाठ्यपुस्तकांमध्ये बदल, शिक्षक प्रशिक्षण, बोर्डांची सहमती आणि योग्य संसाधने उपलब्ध करणे गरजेचे असेल.

संबंधित पोस्ट

जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्याकडून जिल्हा परिषद शाळांची तपासणी; मूलभूत सुविधा व सुरक्षा उपायांची पाहणी

पाणीपट्टी थकविणाऱ्या ग्रामपंचायतींना आवाहन 

जिल्हाधिकारी कार्यालयातमहात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन

vishwatmaklokswamivarta

राज्यात मधक्रांती घडवून आणण्यासाठी खादी ग्रामोद्योग मंडळ प्रयत्नशील -खादी ग्रामोद्योग मंडळ सभापती रवींद्र साठे

मुंबईची लेक झाली अंबरनाथची ‘आधुनिक कृषिगाथा’    –दर्शना दामले

जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या-मतदार जनजागृती उपक्रमांची राज्य निवडणुक आयुक्तांकडून वाखाणणी

vishwatmaklokswamivarta