vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

आज 15 ऑक्टोबर पोलीस पाटील पदासाठी मुलाखतीचे आयोजन

आज 15 ऑक्टोबर पोलीस पाटील पदासाठी मुलाखतीचे आयोजन

   जालना प्रतिनिधी- जालना जिल्ह्यातील जालना, बदनापूर उपविभागातील एकूण १८५ पोलीस पाटील पदांसाठी लेखी परीक्षा दि. १२ ऑक्टोबर २०२५ रोजी संपन्न झाली. लेखी परीक्षेचा निकाल दि. १४ ऑक्टोबर २०२५ रोजी भरती प्रक्रियेचे अधिकृत संकेतस्थळ jalnapp.recruitonline.in वर प्रसिध्‍द करण्‍यात आलेला आहे. तरी लेखी परीक्षेत उत्तीर्ण ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती दि. १५ ऑक्टोबर २०२५ सकाळी ८ वाजेपासून सुरू होणार आहेत. मुलाखतीचे सविस्तर वेळापत्रक आणि वेळ अधिकृत संकेतस्थळ recruitonline.in वर प्रसिद्ध करण्‍यात आलेले आहे. मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रे आणि त्यांच्या दोन स्‍वयंसाक्षांकित प्रती तसेच नजीकच्या काळातील दोन पासपोर्ट आकाराचे फोटोसोबत घेऊन सकाळी ७.३० वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय, जालना येथे मुलाखतीस उपस्थित रहावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

 

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

तंत्रज्ञान, उत्पादन आणि सेवा उद्योग क्षेत्रासाठी-वाकायामा प्रांताशी सहकार्य अधिक दृढ करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

वाळू मिळविण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करा

विकसित महाराष्ट्र- २०४७’ सर्वेक्षणात सहभागी होण्यासाठीvनागरिकांना प्रोत्साहित करावे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विधानसभेत निवेदनाद्वारे आवाहन

पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील १३ वी अर्थव्यवस्था होईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यपालाच्या अभिभाषणावर मुख्यमंत्र्यांचे उत्तर

निर्यात क्षेत्रास प्रोत्साहन आणि रोजगार निर्मितीसाठी कार्यशाळा उपयुक्त  –जिल्हाधिकारी किशन जावळे

छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंतीचा उत्सव समिती बुलढाणा..प्रबोधनात्मक व सांस्कृतिक कार्यक्रमांची यावर्षी रेलचेल!

vishwatmaklokswamivarta