vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जरंडेश्वर उपकेंद्रातून 33 केव्ही नेर उपसा सिंचन योजनेवरील वाहिनी आज होणार कार्यान्वित नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे महावितरणचे आवाहन*

जरंडेश्वर उपकेंद्रातून 33 केव्ही नेर उपसा सिंचन योजनेवरील वाहिनी आज होणार कार्यान्वित नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे महावितरणचे आवाहन*

 

सातारा प्रतिनिधी- महावितरण कंपनीतर्फे 220/33 केव्ही चिमणगांव गोटे (जरंडेश्वर) उपकेंद्रातून निर्गमित होणाऱ्या 33 केव्ही नेर उपसा सिंचन (जिहे कठापुर प्रकल्प) योजनेच्या वाहिनीचे काम पूर्ण झाले असून हि वाहिनी दि. 16 ऑक्टोबर 2025 रोजी / नंतर कधीही कार्यान्वित होऊ शकते. सदरची वाहिनी जरंडेश्वर उपकेंद्र ते भाटमवाडी, रामोशीवाडी, वर्धनगढ, पाचारणेवाडी, जाधववाडी, शिंपी मळा, फडतरवाडी या गावामधून ते नेर उपसा सिंचन योजना टप्पा क्र.1 ते नेर टप्पा क्र. 1 पवारवाडी, ता. खटाव अशा मार्गाने निर्गमित होत असल्याने सदर वाहिनीवरील सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन कार्यकारी अभियंता, वडूज यांनी केले आहे.

 सदर उच्चदाब वीज वाहिन्यांचे कोणत्याही प्रकारे संपर्क येईल अशा प्रकारची कृती म्हणजे सदर वीज वाहिन्यांखालून उंच, लोखंडी सळ्या, लाकडी बांबू, लोखंडी पाईप इत्यादी कोणत्याही प्रकारच्या तत्सम वस्तू नेऊ नयेत. सदर वीज वाहिन्यांच्या खांबावर चढणे, ताणावर कपडे वाळत घालणे अगर गुरु बांधणे अशी कृती करु नये. तसेच वीज वाहिन्यांच्या खांबाशी लहान मुलांना खेळू देऊ नये. त्यामुळे वीज अपघात व धोका होऊ शकतो. तरी वरील सुचनांचे उल्लघंन केल्यास व अपघात घडल्यास म.रा. वि. वि.कंपनी त्यास कोणत्याही प्रकारे जबाबदार राहणार नाही. याची कृपया सर्व नागरिकांनी व संबंधातांनी नोंद घ्यावी असे कार्यकारी अभियंता, वडूज यांनी कळविले आहे.

0 0 0 0

संबंधित पोस्ट

फुले दाप्त्यांना अपेक्षित मानवसेवा पैकी एक निराधार वृद्धांची सेवा होय-प्रताप भांबळे सावित्रीबाई फुले जयंती निमित्त धान्य कोठी भेट…

गेमिंग केवळ करमणूक नसून आगामी काळातडिजिटल परिवर्तनाचा मुख्य घटक ठरेल,· ‘बिलियन डॉलर बेट्स पॉवरेड बाय लुमिकाई इन्व्हेस्टर विव ऑन गेमिंग्स नेक्स्ट फ्रंटियर’ विषयावर चर्चासत्र..

समाज परिवर्तनाचे माध्यम म्हणून डॉ.आंबेडकर महाविद्यालयाने कार्य करावे     -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विद्यार्थ्यांनी डॉ.आंबेडकरांच्या विचाराचा अंगीकार करत ध्येय गाठावे-सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई § डॉ.आंबेडकर महाविद्यालयाचा हीरक महोत्सवी सोहळा उत्साहात..

आव्हानांवर मात करूया, आपत्तीग्रस्त बांधवांना नव्या उमेदीने उभे करुया – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस**विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा देताना निर्धार*

vishwatmaklokswamivarta

राज्यातील बसस्थानक अत्याधुनिक सेवासुविधायुक्त करणार- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

vishwatmaklokswamivarta

नयना गुंडे यांनी विभागीय आयुक्त पदाचा पदभार स्विकारला