vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

दिव्यांगांप्रती संवेदनशीलता जागृती कार्यशाळेचा उपक्रम स्तुत्य- जिल्हाधिकारी अशोक काकडे- दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियमअन्वये कार्यशाळा उत्साहात

दिव्यांगांप्रती संवेदनशीलता जागृती कार्यशाळेचा उपक्रम स्तुत्य- जिल्हाधिकारी अशोक काकडे- दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियमअन्वये कार्यशाळा उत्साहात

 सांगली, प्रतिनिधी.) : माणूस म्हणून आपल्या प्रत्येकाला हक्क आहे. तसेच दिव्यांगांनाही त्यांचे हक्क आहेत. त्यांना असलेल्या हक्कांची समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी दिव्यांगांप्रती संवेदनशीलता जागृती कार्यशाळेचा उपक्रम हा अतिशय स्तुत्य आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले.  राज्य व केंद्र शासनाच्या सांगली जिल्ह्यातील सर्व कार्यालयातील वर्ग 1 व वर्ग 2 अधिकाऱ्यांचे दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम अन्वये दिव्यांगांप्रती संवेदनशीलता जागृती कार्यशाळेच्या उद्‌घाटन प्रसंगी ते बोलत होते. मिरज येथील कै. रा. वि. भिडे मूकबधीर शाळेत आयोजित या कार्यशाळेस जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी भारत निकम, जिल्हधिकारी महोदयांच्या सुविद्य पत्नी शरदिनी काकडे, संस्थेचे अध्यक्ष सुरेश आवटी यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

मा. दिव्यांग कल्याण आयुक्त यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील वर्ग एक व वर्ग दोन अधिकारी व कर्मचारी यांच्याकरिता दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ कलम ३९ अन्वये दिव्यांगांप्रती संवेदनशीलता जागृती होण्यासाठी या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेमध्ये शिक्षण, पुनर्वसन, रोजगार व विविध योजनांच्या संबंधित चर्चा करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील दिव्यांगांना अनेक पद्धतीने लाभ मिळवून देण्याकरिता जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाच्या वतीने सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

00000

संबंधित पोस्ट

स्वच्छ भारतसाठी आयटीआय पॅटर्न,कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री लोढा यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील ७५० गावात स्वच्छता अभियान संपन्न

vishwatmaklokswamivarta

धाकलगावात शंकरपटाचा थरार! बैलगाड्यांच्या वेगवान दौडीने प्रेक्षक झाले मंत्रमुग्ध…

पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याकरीता रायगड जिल्ह्यातील खाजगी आस्थापनांना रिक्तपदे अधिसूचित करण्याचे आवाहन..

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने 7 फेब्रुवारी रोजी सुट्टी   

vishwatmaklokswamivarta

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर गणेशोत्सवादरम्यान जड वाहनांना वाहतूक बंदी..

विश्वास नांगरे पाटील यांनी छावा चित्रपटावर ही प्रतिक्रिया दिली आहे जी सोशल मीडियावर व्हायरल

vishwatmaklokswamivarta