vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

महाराष्ट्र शासनाचे नऊ, ११, १६ व २५ वर्षे मुदतीचे रोखे विक्रीस

महाराष्ट्र शासनाचे नऊ, ११, १६ व २५ वर्षे मुदतीचे रोखे विक्रीस

       मुंबई, प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या नऊ, ११,१६ व २५ वर्षे मुदतीच्या रोख्यांची विक्री शासनाच्या सुधारित अधिसूचनेतील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. नऊ व २५ वर्षे मुदतीच्या प्रत्येकी १,००० कोटींच्या रोख्यांची आणि ११ व १६ वर्षे मुदतीच्या प्रत्येकी १,५०० कोटींच्या रोख्यांची विक्री करण्यात येईल.या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कामासाठी अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी प्रत्येक रोख्यासाठी स्वतंत्र पत्रकान्वये दिली आहे.

   अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या १० टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र एका गुंतवणुकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीत जास्त एक टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंत वाटप करण्यात येईल.  २० ऑक्टोबर, २०२५ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे मुंबई फोर्ट येथील कार्यालयात लिलाव केला जाईल. तर लिलावाच्या बोली २० ऑक्टोबर, २०२५ रोजी संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाच्या आहेत.

  यामध्ये स्पर्धात्मक बोली संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी १०.३० ते ११.३० वाजेपर्यंत सादर कराव्यात. तर अस्पर्धात्मक बोली ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी १०.३० ते ११.०० पर्यंत सादर कराव्यात. लिलावाचा निकाल त्याच दिवशी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बोलीदारांकडून रकमेचे प्रदान २३ ऑक्टोबर, २०२५ रोजी रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.

     नऊ वर्ष कालावधीच्या कर्जरोख्यांचा कालावधी १० सप्टेंबर, २०२५ पासून सुरू होईल. कर्जरोख्याची परतफेड दिनांक १० सप्टेंबर, २०३४ रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. तर कर्जरोख्याचा व्याजाचा दर हा दरसाल दर शेकडा ७.२४ टक्के दराएवढा असेल. व्याजाचे प्रदान प्रतिवर्षी दिनांक मार्च १० आणि सप्टेंबर १० रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल   ११ वर्ष कालावधीच्या कर्जरोख्यांचा कालावधी २३ ऑक्टोबर, २०२५ पासून सुरू होईल. कर्जरोख्याची परतफेड दिनांक २३ ऑक्टोबर, २०३६ रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. तर कर्जरोख्याचा व्याजाचा दर हा दरसाल दर शेकडा कूपन दराएवढा असेल. व्याजाचे प्रदान प्रतिवर्षी दिनांक एप्रिल २३ आणि ऑक्टोबर २३ रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

 १६ वर्ष कालावधीच्या कर्जरोख्यांचा कालावधी ८ ऑक्टोबर, २०२५ पासून सुरू होईल. कर्जरोख्याची परतफेड दिनांक ८ ऑक्टोबर, २०४१ रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. तर कर्जरोख्याचा व्याजाचा दर हा दरसाल दर शेकडा ७.२६ टक्के दराएवढा असेल. व्याजाचे प्रदान प्रतिवर्षी दिनांक एप्रिल ८ आणि ऑक्टोबर ८ रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल

     २५ वर्ष कालावधीच्या कर्जरोख्यांचा कालावधी २३ ऑक्टोबर, २०२५ पासून सुरू होईल. कर्जरोख्याची परतफेड दिनांक २३ ऑक्टोबर, २०५० रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. तर कर्जरोख्याचा व्याजाचा दर हा दरसाल दर शेकडा कूपन दरा एवढा असेल. व्याजाचे प्रदान प्रतिवर्षी दिनांक एप्रिल २३ आणि ऑक्टोबर २३ रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम, १९४९ खालील कलम २४ अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील, अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

 

०००

संबंधित पोस्ट

महिला आयोग आपल्या दारी’ बुधवारी सांगली जिल्ह्यातमहिलांनी पुढाकार घेत आपल्या तक्रारी मांडाव्या रुपाली चाकणकर यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

मतदारयादी अद्ययावत आणि अचूक तयार करावी – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम जिल्हाधिकारी कार्यालयात मतदार नोंदणी अधिकाऱ्यांसमवेत बैठक

vishwatmaklokswamivarta

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी बीड येणार रेल्वेच्या नकाशावर,बीड ते परळी रेल्वे मार्ग कामाला गती देऊन रेल्वे मार्ग पूर्ण करा- उपमुख्यमंत्री अजित पवार,बीड ते अहिल्यानगर मार्गावर सुरू होणार रेल्वे..

vishwatmaklokswamivarta

एक महिन्यात मराठी शिकण्याची संधी, अन्यथा बॅज तीन महिन्यांसाठी निलंबित – मंत्री प्रताप सरनाईक व्यावहारिक मराठी येत नसलेल्या १ हजार २६८ चालकांना नोटीस ३० सप्टेंबरपर्यंत राज्यभर तपासणी मोहीम

राज्यात सन 2026-27 साठी सुधारित प्रधानमंत्री पिक विमा योजना लागू खरीप हंगाम 2026 मध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एमपीएससीत,मुलींमध्ये राज्यात अव्वल आलेल्या ‘महाज्योती’च्या मैत्रेयी जमदाडे हिचा सत्कार