vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

महिला आयोग आपल्या दारी’ बुधवारी सांगली जिल्ह्यातमहिलांनी पुढाकार घेत आपल्या तक्रारी मांडाव्या रुपाली चाकणकर यांचे आवाहन

‘महिला आयोग आपल्या दारी’ बुधवारी सांगली जिल्ह्यातमहिलांनी पुढाकार घेत आपल्या तक्रारी मांडाव्या रुपाली चाकणकर यांचे आवाहन

 मुंबई प्रतिनिधी- महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत सांगली जिल्ह्यात बुधवार दि. १५ आँक्टोबर, २०२५ रोजी जनसुनावणी होणार असून, आयोगाच्या मा. अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर तक्रारींची सुनावणी घेणार आहेत. नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथे सकाळी ११ वाजता होणाऱ्या जनसुनावणीस महिलांनी पुढे येऊन न घाबरता आपल्या तक्रारी मांडाव्यात, असे आवाहन आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर यांनी केले आहे.

 महिलांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी न्याय मिळावा यासाठी आयोगाकडून ‘महिला आयोग आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर दि. १५ आँक्टोबर, २०२५ रोजी सांगली जिल्ह्यात असणार आहेत. यावेळी जिल्हास्तरावरील जनसुनावणी घेत महिलांच्या तक्रारीचे निवारण करण्याचा प्रयत्न आहे. जनसुनावणी नंतर जिल्ह्यातील महिला व बालकांच्या प्रश्नांच्या अनुषंगाने प्रशासन, पोलीस, कामगार, परिवहन, आरोग्य, शिक्षण आदी विभागांची आढावा बैठक घेण्यात येणार आहे.

 ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमाबाबत आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती चाकणकर म्हणाल्या, ‘महाराष्ट्र राज्य महिला आयोग महिलांच्या सक्षमीकरणासाठी अविरत कार्यरत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातील महिलांना मुंबई कार्यालयात येऊन तक्रार करणे, सुनावणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणे, आर्थिकदृष्ट्या तसेच इतर कारणांमुळे शक्य होत नाही. त्यामुळे आयोग जिल्हास्तरावर सर्व यंत्रणेनिशी जात आहे. महिला आयोग आपल्या दारी अंतर्गत जनसुनावणीला पोलिस, प्रशासन, विधी सल्लागार, समुपदेशक, जिल्हा समन्वयक आदी उपस्थित असल्याने तक्रारीवर त्याच ठिकाणी कार्यवाही करण्यात येते. यातून आपली कैफियत मांडणाऱ्या महिलांना त्वरित दिलासा देण्याच काम आयोग करत आहे.

000000

संबंधित पोस्ट

नववर्ष प्रण-सुरक्षित अन्न’ मोहिमेचा समारोप;दर्जेदार रेस्टॉरंट्सचा जिल्हाधिकारी  आशिमा मित्तल यांच्या हस्ते गौरव

सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांची अपघातग्रस्त युवकांच्या आरोग्याची विचारपूस, दिलासा आणि धीर

आठवी आर्थिक गणना; प्रशासनाची पूर्वतयारी सुरु

vishwatmaklokswamivarta

ठाणे शहरात ३ बेकायदेशीर हुक्का पार्लरवर कारवाई

जिल्ह्यात एल.पी.जी. गॅसचा मुबलक साठा; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन तक्रारीसाठी तालुकानिहाय संपर्क क्रमांक जाहीर

रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशी करण्याचा राग मनात ठेवून सरपंच पिता पुत्राकडून शिक्षकाला मारहाण!लोखंडी हुकने डोक्यात वार, जिवे मारण्याची दिली धमकी; वरखेडा सिंदखेड येथील घटना…