vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षिततेचा’विशेष तपासणी अभियानांतर्गत राज्यात ३ हजार ४८५ अन्न आस्थापनांची तपासणीअन्न व औषध प्रशासन विभागाची माहिती.

सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षिततेचा’विशेष तपासणी अभियानांतर्गत राज्यात ३ हजार ४८५ अन्न आस्थापनांची तपासणीअन्न व औषध प्रशासन विभागाची माहिती.

मुंबई, प्रतिनिधी:- अन्न व औषध प्रशासना विभागामार्फत राज्यात ‘सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षिततेचा’ हे विशेष तपासणी अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत १२ ऑक्टोबर २०२५ पर्यंत राज्यात ३ हजार ४८५ अन्न आस्थापनांची तपासणी करण्यात आली. तपासणीमध्ये दूध, खवा/मावा, खाद्यतेल, तूप, मिठाई, ड्रायफ्रूट्स, चॉकलेट्स, भगर व अन्य अन्नपदार्थांचे एकूण ४ हजार ६७६ नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. या तपासणीत अनियमितता आढळलेल्या एक हजार ४३१ आस्थापनांना सुधारणा नोटीस देण्यात आली असून ४८ आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले तर एका आस्थापनेचा परवाना रद्द करण्यात आला असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाने दिली आहे.

     जनतेस सुरक्षित, दर्जेदार अन्न उपलब्ध करून देण्यासाठी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, राज्यमंत्री योगेश कदम, सचिव धीरज कुमार व आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न व औषध प्रशासना विभागांमार्फत राज्यात सणासुदीच्या कालावधीत अन्नपदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी ‘सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षिततेचा’ हे विशेष तपासणी अभियान राबविण्यात येत आहे. हे अभियान दिनांक ११ ऑगस्ट २०२५ ते २५ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत राबविण्यात येत आहे.

 नागरिकांनीही सणासुदीच्या काळात अन्नपदार्थ खरेदी करताना गुणवत्ता, पॅकिंगवरील माहिती आणि परवाना क्रमांक यांची खात्री करूनच खरेदी करावी. भेसळीबाबत संशय आल्यास जवळच्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांशी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाने केले आहे.

संबंधित पोस्ट

जिल्ह्यातील वाळू घाटांचा प्रारूप जिल्हा सर्व्हेक्षण अहवाल जाहीरØ एमआरसॅकमार्फत सर्वेक्षणØ अभिप्राय, सूचना अथवा निवेदन सादर करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

एमपीएससी गट-ब परीक्षेसाठी प्रोत्साहनपर अर्थसहाय्य योजना; अर्ज करण्याचे आवाहन

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत एकूण 12 लाख 71 हजार 295 विद्यार्थ्यांची नोंदणी

ऑनलाईन मालमत्ता करभरणा प्रणालीला उत्साही प्रतिसाद देत करदात्या नागरिकांमध्ये 15 टक्के वाढ लवकरच अद्ययावत ‘भारत बिल पेमेंट सिस्टम’चाही कर भरण्यासाठी होतोय समावेश..

आपलं मंत्रालय’ गृहपत्रिका अंकाचे प्रधान सचिव डॉ. अतुल पाटणे यांच्या हस्ते प्रकाशन

इयत्ता दहावी, बारावी परीक्षा पूर्वतयारीचा-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी घेतला आढावा

vishwatmaklokswamivarta