vishwatmaklokswamivarta
Breaking News
करमणुक

ज्येष्ठ अभिनेत्री संध्या यांच्या स्मृतीप्रित्यर्थ १९ ऑक्टोबर रोजी कार्यक्रमाचे आयोजन

ज्येष्ठ अभिनेत्री संध्या यांच्या स्मृतीप्रित्यर्थ १९ ऑक्टोबर रोजी कार्यक्रमाचे आयोजन

सांस्कृतिक प्रतिनिधी –

मुंबई,  भारतीय चित्रपटसृष्टीतील १९५०-६० च्या दशकातील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे संध्या शांताराम. त्यांनी आपल्या अप्रतिम नृत्यकौशल्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली होती. नुकतेच वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले. या गुणी अभिनेत्रीच्या स्मृतिप्रीत्यर्थ एका खास कार्यक्रमाचे आयोजन कालनिर्णय कडून करण्यात आले आहे. कालनिर्णय आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या संयुक्तविद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे.

हा कार्यक्रम प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या तिसऱ्या मजल्यावरील लघु नाट्यगृहात रविवारी, १९ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी २.३० ते सायंकाळी ७ पर्यंत होईल. यावेळी व्ही. शांताराम निर्मित दिग्दर्शित आणि विश्राम बेडेकर लिखित ‘अमर भूपाळी’ हा सिनेमा दाखवण्यात येईल. ज्येष्ठ चित्रपट समीक्षक आणि अभ्यासक अशोक राणे हे संध्या यांच्या कारकिर्दीचा आढावा घेत ‘अमर भूपाळी’ या चित्रपटाविषयी भाष्य करतील.

हा कार्यक्रम सर्व कला आणि चित्रपट रसिकांसाठी विनामूल्य खुला असून रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

संगीत, संस्कृती आणि राष्ट्राभिमानाचा जागर : किल्ले पुरंदरावर ‘जयतु शंभू’ भव्य सांस्कृतिक कार्यक्रम

माध्यमांसाठी शेवटची संधी: 56 व्या इफ्फीसाठी माध्यम अधिस्वीकृती पोर्टल 17 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत पुन्हा उघडले..

vishwatmaklokswamivarta

मित्र सहयोग, ठाणे यांची ‘अनोळखी’ ठरली सर्वोत्कृष्ट उत्तरार्ध एकांकिका

 संवाद तर्फे माहीम मध्ये संगीतोपचार म्युझिक थेरेपी ज्येष्ठांसाठी कार्यक्रम संपन्न

वेव्हज 2025- भारत सरकारच्या वतीने आयोजित पहिली जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद

चतु:रस्त्र अभिनेत्री निवेदिता सराफ यांचा यंदाचा गंधार गौरव पुरस्कार देऊन सन्मान, स्वरा जोशी हिला ही गंधार बाल पुरस्कार प्रदान.

vishwatmaklokswamivarta