vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी अनाथ मुलांसोबत साजरी केली दिवाळी मुलांसोबत पणती रंगविण्यात आणि आकाश कंदील बनविण्यात उत्साहाने घेतला सहभाग…

पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी अनाथ मुलांसोबत साजरी केली दिवाळी मुलांसोबत पणती रंगविण्यात आणि आकाश कंदील बनविण्यात उत्साहाने घेतला सहभाग…

मुंबई, प्रतिनिधी : दिवाळीचा सण म्हणजे फक्त दिव्यांचा, फटाक्यांचा किंवा सजावटीचा उत्सव नाही तर तो माणुसकीचा, प्रेमाचा आणि एकोप्याचा उत्सव आहे, हा विचार करून पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी आज एका आगळ्यावेगळ्या आणि हृदयस्पर्शी कार्यक्रमात अनाथ मुलांसोबत दिवाळी साजरी केली. या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मंत्री श्रीमती मुंडे भावूक झाल्या.

केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालय आणि द चिल्ड्रन्स एड सोसायटी फॉर अंडरप्रिव्हिलेज्ड किड्स ऑर्फनेजच्या यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय आधुनिक कला दालन, मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात श्रीमती मुंडे यांनी भेट दिली. यावेळी आधुनिक कला संग्रहालयाच्या संचालक निधी चौधरी उपस्थित होत्या.

मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, ही अनाथ मुलं कोणत्या जातीची, धर्माची आहेत हे महत्त्वाच नाही, तर ती माणसाची आहेत आणि त्यांच्या डोळ्यांतील आनंद हा समाजासाठी प्रेरणादायी आहे. असा समाज घडला पाहिजे, जिथे प्रत्येक माणूस स्वतःची ओळख स्वतः निर्माण करेल.

प्रदूषणमुक्त दिवाळीसाठी पर्यावरण विभागाने समाज माध्यमांद्वारे जनजागृती केली आहे, असे सांगून सर्व नागरिकांनी प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. आपण ध्वनी आणि वायू प्रदूषण टाळून, निसर्गाशी सुसंगत अशी पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करू, असे श्रीमती मुंडे म्हणाल्या.

यावेळी मंत्री पंकजा मुंडे यांनी मुलांसोबत आकाशकंदील तयार केले. तसेच पणत्या रंगवल्या आणि चित्रकला उपक्रमात सहभागही घेतला. या वेळी आकाश कंदील बनविण्याची कार्यशाळेचे आणि प्रसिद्ध कलाकार ए. ए. अल्मेलकर यांच्या कलाकृतीच्या प्रदर्शनाचे उद्घाटन मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.

000000

संबंधित पोस्ट

आणीबाणीला 50 वर्षे पूर्णजिल्हाधिकारी कार्यालयात आणीबाणीविरोधी सत्याग्रहींचा सन्मान-भारतमाता की जय.. वंदे मातरम् च्या जयघोषाने दुमदुमले सभागृह

जिल्ह्यातील १ लाख ८७ हजार ६५५ विद्यार्थांना पुरविण्यात येणार मोफत पाठ्यपुस्तके …

जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना पालकमंत्री जयकुमार रावल यांनी हिरवा झेंडा दाखवून केला यात्रेचा शुभारंभ

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या सदस्य निवडीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर*

थंडी आणि अंधारापूर्वीच मतदानाचा हक्क बजावावा;ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांग मतदारांना निवडणूक अधिकारी अशीमा मित्तल यांचे आवाहन• हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे नियोजन• 15 जानेवारी रोजी सकाळी 7.30 ते 5.30 कालावधीत होणार मतदान• मतदार केंद्रापर्यंत जाण्यासाठी दिव्यांग मतदारांसाठी विशेष सुविधा

vishwatmaklokswamivarta

राज्याच्या सर्वांगीण विकासाचा दूरदृष्टीपूर्ण संकल्प – आ. सुधीर मुनगंटीवार-शेतकरी, उद्योग, पायाभूत सुविधा व संस्कृतीच्या संवर्धनाला बळ देणारा अर्थसंकल्प…