vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

संरक्षण व एरोस्पेस उत्पादनाचे प्रमुख केंद्र म्हणून नागपूरची नवीन ओळख – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस प्रकल्पास मिहान येथे भूखंडाचे वितरण

संरक्षण व एरोस्पेस उत्पादनाचे प्रमुख केंद्र म्हणून नागपूरची नवीन ओळख – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस  प्रकल्पास मिहान येथे  भूखंडाचे वितरण …

 

नागपूर, प्रतिनिधी-: मिहान आर्थिक क्षेत्रात सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस ही भारतातील अग्रगण्य उत्पादक कंपनी २३३ एकर क्षेत्रात अत्याधुनिक संरक्षण व एरोस्पेस उत्पादन प्रकल्प उभारणार आहे. या प्रकल्पामुळे संरक्षण उत्पादन उद्योग क्षेत्रात नागपूरला आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यता मिळणार असून यामुळे विदर्भाच्या औद्योगिक प्रगतीत मोठी भर पडणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला.

रामगिरी येथे आयोजित कार्यक्रमात मिहान विशेष आर्थिक क्षेत्रातील आजपर्यंतच्या सर्वात मोठ्या २३३ एकर भूखंडाचे वितरण मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते कंपनीचे अध्यक्ष सत्यनारायण नुवाल यांना करण्यात आले.

या प्रसंगी संरक्षण उत्पादन कंपनीचे मनीष नुवाल, राघव नुवाल, जे.एफ साळवे तसेच महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थपकीय संपादक तथा जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर, गौरव उपश्याम, संजय इंगळे आदी उपस्थित होते.

सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस कंपनी राज्यात १२ हजार ८० कोटीची गुंतणूक करुन अत्याधुनिक संरक्षण व एरोस्पेस उत्पादन प्रकल्प उभारणार आहे. या प्रकल्पामुळे ६ हजार ८०० प्रत्यक्ष रोजगारनिर्मिती होणार आहे. तसेच मिहान आर्थिक क्षेत्रात ६८० कोटी रुपयांची अतिरिक्त गुंतवणूक करुन विमान व संरक्षण उपकरण निर्मिती केंद्र स्थापन करणार आहे. या प्रकल्पामुळे ८७५ प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. हा उपक्रम महारास्ट्राच्या ‘मेक इन इंडिया’ ‘आत्मनिर्भर भारत’ आणि औद्योगिक प्रगतीच्या विकासाठी अधिक बळकटी देणारा ठरणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.

मिहान सेझ प्रकल्पातील सर्वात मोठे भूखंड सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस कंपनीला वितरीत करण्यात येत आहे. महाराष्ट्राच्या प्रगत, गुंतवणूकदार अनुकूल धोरणांचा व अग्रगण्य उद्योगांचा वाढता विश्वास यावरून अधोरेखीत होत असल्याचे यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

शासन व महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे हे फलित आहे. उच्च-मूल्य गुंतवणूक आकर्षित करणे, प्रादेशिक रोजगारनिर्मिती वाढवणे आणि संरक्षण व उत्पादन क्षेत्रात राज्याचे नेतृत्व अधिक दृढ करणे हा त्यामागील हेतू असल्याचे यावेळी एमएडीसीचे सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. विपीन ईटनकर यांनी सांगितले.

 

०००००

संबंधित पोस्ट

इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड’ने घेतली पंढरपूरच्या महाआरोग्य शिबिराची नोंदआरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत वारकऱ्यांसाठी ठरले ‘आरोग्य दूत’

vishwatmaklokswamivarta

आदिवासी समाजातील इच्छुक उमेदवारांना 7 एप्रिल पर्यंत कर्ज फॉर्म भरण्याचे आवाहन..

लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी 32 रायगड लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या दिवशी एका अपक्ष उमेदवाराचे नामनिर्देशन पत्र दाखल..

गणेशोत्सवानिमित्त राज्याबाहेर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन डेहराडून, बडोदा, दिल्ली, बेळगाव, गोवा येथे सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून गणेशोत्सव

vishwatmaklokswamivarta

नाशिक येथील धबधब्याजवळ अडकलेल्या 22 पर्यटकांची सुटका तर 1 जण वाहून गेल्याची शक्यता….

महा ‘मेट्रो’ने देशात नवीन कार्यसंस्कृती आणली – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘बेटर दॅन द ड्रीम्स’ पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन