vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सातारा जिल्ह्यातील ‘साखरवाडी’ आणि पुणे जिल्ह्यातील ‘कुंजीरवाडी’ गावांना जैवविविधता संवर्धनासाठी केंद्र सरकारकडून निधी

सातारा जिल्ह्यातील ‘साखरवाडी’ आणि पुणे जिल्ह्यातील ‘कुंजीरवाडी’ गावांना सातारा जिल्ह्यातील ‘साखरवाडी’ आणि पुणे जिल्ह्यातील ‘कुंजीरवाडी’ गावांना जैवविविधता संवर्धनासाठी केंद्र सरकारकडून निधी संवर्धनासाठी केंद्र सरकारकडून निधी…

 

नवी दिल्ली, प्रतिनिधी : भारताच्या समृद्ध जैविक वारशाचे संरक्षण आणि स्थानिक समुदायांना त्यांच्या योगदानाचे फायदे मिळवून देण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणाने महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील जैवविविधता संवर्धनासाठी 1 कोटी 36 लाख रुपयांचा निधी जारी केला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील साखरवाडी आणि पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील कुंजीरवाडी या गावांना विशेष महत्त्व देण्यात आले आहे. या गावांना प्रत्येकी 45.50 लाख रुपयांचा निधी प्राप्त होणार आहे.
राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणाने हा निधी महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील राज्य जैवविविधता मंडळांमार्फत वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत साखरवाडी (सातारा), कुंजीरवाडी (पुणे) आणि उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यातील कासगंज परिसरातील जैवविविधता व्यवस्थापन समित्यांना निधी प्राप्त होणार आहे. हा निधी जैवविविधता कायदा 2002 च्या कलम 44 आणि संबंधित राज्य जैवविविधता नियमांनुसार वाटप करण्यात येत आहे. या निधीचे वितरण एका व्यावसायिक संस्थेने माती आणि औद्योगिक सांडपाण्याच्या नमुन्यांमधून सूक्ष्मजीव घेऊन प्रीबायोटिक घटक असलेल्या फ्रुक्टो-ओलिगोसेकेराइड्सच्या उत्पादनासाठी केलेल्या वापराची भरपाई म्हणून करण्यात येत आहे. या निधीच्या माध्यमातून स्थानिक समुदायांना जैवविविधतेच्या शाश्वत वापराचे लाभ मिळणार असून, संवर्धनाच्या प्रयत्नांना चालना मिळणार आहे.
ही योजना अद्ययावत राष्ट्रीय जैवविविधता कृती आराखडा मधील राष्ट्रीय जैवविविधता लक्ष्य-13 शी सुसंगत असून ही योजना संयुक्त राष्ट्रांच्या जैवविविधता परिषदेच्या कुनमिंग मॉन्ट्रियल जागतिक जैवविविधता फ्रेमवर्कशी जोडली गेली आहे.
♦साखरवाडी आणि कुंजीरवाडी येथील स्थानिक गटांना या निधीमुळे जैवविविधतेच्या संरक्षणासाठी नवीन संधी उपलब्ध होणार असून, संवर्धन आणि समृद्धी हातात हात घालून पुढे जाण्याचा मार्ग मोकळा होईल. या आर्थिक रणनीतीमुळे स्थानिक पातळीवरील गट सक्षम बनतील तसेच जैवविविधतेच्या संवर्धनासह शाश्वत विकासाला देखील प्रोत्साहन मिळेल.

 

0000

 

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात ‘पोकरा’ अंतर्गत कृषी अवजार बँकेसाठी आर्थिक सहाय्य; 5 एप्रिलपर्यंत अर्जाचे आवाहन

लोकशाहीच्या बळकटीकरणात मतदारांचा सहभाग महत्त्वाचा -जिल्हाधिकारी किशन जावळे,राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त निवडणुकीत उत्कृष्ट काम केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान

vishwatmaklokswamivarta

महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक -2025शासकीय, निमशासकीय कार्यालये, संस्था, विश्रामगृहपरिसरात मिरवणूका काढणे, घोषणा देण्यास निर्बंध…

vishwatmaklokswamivarta

शिक्षकांचे योगदान भारताला सुपर पॉवर बनवेल – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू महाराष्ट्रातील सहा शिक्षक ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२५’ ने सन्मानित

vishwatmaklokswamivarta

शिवनगर येथे स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबिर; १५ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभागरक्तदान हेच जीवनदानचा संदेश; सेवा व समर्पणातून मानवतेचा जागर

नमुंमपा क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांच्या सर्वेक्षणासाठी आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठक..