vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अकोला जिल्ह्यातील पीक विमा योजनेतीलशेतकऱ्यांना विमा रकमेचे पैसे मिळाले कृषी विभागाचा खुलासा

अकोला जिल्ह्यातील पीक विमा योजनेतीलशेतकऱ्यांना विमा रकमेचे पैसे मिळाले कृषी विभागाचा खुलासा

मुंबई, प्रतिनिधी: अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून खरीप हंगाम २०२४ मध्ये ९.४५ कोटी रूपये नुकसानभरपाई मिळाली आहे. शेतकरी ओळखपत्रानुसार कमीत कमी १००४ रूपये नुकसान भरपाई देण्यातआली. ५ ते २७ रूपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाल्याच्या बातम्या काही वृत्तपत्र, वृत्तवाहिन्यावर प्रसारित होत आहेत, त्या वस्तूस्थितीला धरून नसल्याचा खुलासा अकोला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी दिला आहे.

अकोट तालुक्यातील कुटासा परिसरातील दिनोडा, मरोडा, कावसा व रेल या गावातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांना १००० रूपयांपेक्षा कमी रक्कम दिलेली नाही. शेतकरी अरुण राऊत यांना ५ रुपये ८ पैसे व गणपत सांगळे यांना १३ रुपये विमा अदा केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. मात्र प्रत्यक्षात अरुण राऊत यांना ३८६७ रूपये आणि गणपत सांगळे यांना ३६३६ रूपये विमा रक्कम अदा केली आहे शिवाय संदीप घुगे, विजय केंद्रे, केशव केंद्रे, आदित्य मुरकुटे व उमेश कराड यांनी खरीप हंगाम सन२०२४ मध्ये पीक विमा योजनेमध्ये सहभाग नोंदवला नसल्याचा खुलासा विमा कंपनीने कळविल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले.

000

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत लातूर जिल्हा अग्रेसर!**महावितरणच्या व्यवस्थापकीय संचालकांनी केले जिल्हा प्रशासन, महावितरणच्या कामाचे कौतुक*

सांस्कृतिक कार्यक्रमांनी महिला गौरव सप्ताहाची सांगता-सकारात्मकता निर्माण करा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

पुण्यातील नसरापूर प्रकरणात वेगवान न्यायासाठी विशेष प्रयत्न; कुटुंबाचे संरक्षण व पुनर्वसन करणे ही सरकारची बांधिलकी– उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे“आईच्या हंबरड्याने मन हेलावलं… चिमुकलीच्या न्यायासाठी लढा थांबणार नाही”महिलांविरोधातील गुन्ह्यांसाठी फास्टट्रॅक न्यायालये वाढवण्याची गरज अधोरेखित; मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार

आदिवासी सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी प्रशिक्षण 

मारवाडी गल्लीतील रस्त्याची डागडूजी : नागरिकांत आनंदशिवसेना शहरप्रमुख दुर्गेेश काठोठीवाले यांच्या मागणीला यश..

कॉर्पोरेट जिहाद’च्या विरोधात जनजागृती अभियान या विषयावर मुंबई येथे विशेष संवाद !वर्ष ७११ पासून सुरु असलेल्या जिहादच्या षडयंत्राविषयी हिंदूंमध्ये जागृती करण्यासाठी जनजागृती अभियान !* – श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदू जनजागृती समिती