vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

कार्तिकी एकादशीच्या शुभदिनी पंढरपुरातील विठ्ठलाच्या मंदिरात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवार सहकुटुंब शासकीय महापूजा संपन्न बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल करावा विठ्ठल, जीवभाव…

कार्तिकी एकादशीच्या शुभदिनी पंढरपुरातील विठ्ठलाच्या मंदिरात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवार सहकुटुंब शासकीय महापूजा संपन्न

बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल करावा विठ्ठल, जीवभाव…

पंढरपूर प्रतिनिधी-कार्तिकी एकादशीच्या शुभदिनी पंढरपुरातील विठ्ठलाच्या मंदिरात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवार सहकुटुंब शासकीय महापूजा केली. यावेळी नांदेडच्या हिमायतनगरमधील पोटा गावचे रामराव आणि सुशीलाबाई वालेगावकर या मानाच्या वारकऱ्यांसोबत शासकीय महापूजेला बसण्याचे सौभाग्य मिळाले.

यावर्षी प्रथमच जिल्हा परिषद शाळेतील दोन मुलांना शासकीय महापुजेमध्ये सहभागी करून घेण्यात आले होते. पूजेनंतर मंदिर समितीच्या वतीने तुळशीची माळ घालून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवार यांना सन्मानित करण्यात आले.

यानिमित्ताने गेली सलग तीन वर्षे आषाढी वारीनिमित्त तर यंदा प्रथमच कार्तिकी वारीनिमित्त विठ्ठलाची महापूजा करण्याचे सौभाग्य शिंदे परिवार यांना लाभले. विशेष म्हणजे यांच्या कुटुंबातील चार पिढ्यांना एकत्रपणे या पूजेमध्ये सहभागी होता आले हे मी माझे परम भाग्यच असे ट्विटरवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले

राज्यात सध्या शेतकऱ्यांना आस्मानी संकटाचा सामना करावा लागत आहे. नोव्हेंबर महिना आला तरीही पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होते आहे. त्यामुळे राज्यातील बळीराजाला सुखी, समाधानी, आनंदी ठेव, त्यांच्यावरील सर्व संकटे दूर कर एवढेच साकडे विठुरायाच्या चरणी घातले. यावेळी शिंदे यांचे वडील संभाजी शिंदे, पत्नी सौ.लता शिंदे, कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, सून वृषाली शिंदे, नातू रुद्रांश शिंदे तसेच श्री विठ्ठल रखुमाई मंदिराचे विश्वस्त गहिनीनाथ महाराज औसेकर, पदाधिकारी आणि  सहकारी मंत्री जयकुमार गोरे, भरतशेठ गोगावले, प्रशासकीय अधिकारी आणि वारकरी बंधू भगिनी उपस्थित होते.

 

#Pandharpur #कार्तिकी_एकादशी

संबंधित पोस्ट

🎖️ ज्येष्ठ अभिनेते आणि निर्माते मागांती मुरली मोहन यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाला आजपासून सुरुवात*नागरिकांनी सक्रीय सहभाग नोंदविण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबईतील जुईनगर येथे रंगणार दशावतारी नाट्य महोत्सव…

vishwatmaklokswamivarta

आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रम; इच्छुकांकडून अर्ज मागविले..

vishwatmaklokswamivarta

स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याबाबतचे आश्वासन पूर्ण न झाल्याने आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा हक्कभंगाचा प्रस्ताव

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पदावरून हटवावं अशी मागणी लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली.