vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या अनुषंगाने अंतिम मतदार यादी सुधारित कार्यक्रम जाहीर-विक्रांत चव्हाण-उपजिल्हाधिकारी (महसूल)

जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या अनुषंगाने अंतिम मतदार यादी सुधारित कार्यक्रम जाहीर-विक्रांत चव्हाण-उपजिल्हाधिकारी (महसूल)

सातारा प्रतिनिधी: जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या अनुषंगाने राज्य शासनाच्या सूचनेनुसार जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूकासाठी मतदार यादी तयार करण्याचा सुधारित कार्यक्रम जाहीर झाला आहे. यानुसार निवडणूक विभाग व निर्वाचक गणाच्या छापील मतदार याद्या अधिनियमाच्या कलम १३ खाली अधिप्रमाणित करण्याची तारीख 3 नोव्हेंबर 2025 होती. तसेच निवडणूक विभाग व निर्वाचक गणांच्या छापील अंतिम मतदार याद्या माहितीसाठी ठेवण्यात आल्या आहेत, याबाबतची सूचना प्रसिध्द करण्याची तारीख 3 नोव्हेंबर 2025 होती. मतदान केंद्राची यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिध्द करण्याची तारीख 12 नोव्हेंबर 2025 आहे.

यानुसार निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय अंतिम मतदार यादी सातारा जिल्हयातील सर्व तहसिल कार्यालयामध्ये त्या तालुक्याच्या कार्यक्षेत्रातील पंचायत समिती मधील ज्या त्या गट व गणनिहाय यादी दि.3 नोव्हेंबर 2025 रोजी प्रसिध्द करण्यात आलेली आहे. दि. 3 नोव्हेंबरपासून गट व गणनिहाय अंतिम मतदार याद्या कार्यालयीन वेळेत तहसिलदार कार्यालयामध्ये सर्व सर्वसामान्यांना पहावयास उपलब्ध केलेल्या आहेत. तर मतदान केंद्राची यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार यादी दि. 12 नोव्हेंबर 2025 रोजी प्रसिध्द करण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (महसूल) विक्रांत चव्हाण यांनी दिली.

00 0 0

संबंधित पोस्ट

शहीद दिनानिमित्त क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांना अभिवादन; पालकमंत्र्यांसह इतर नेत्यांची उपस्थिती

vishwatmaklokswamivarta

टीबी मुक्त भारत’ अभियान झोपडपट्ट्यांपर्यंत नेण्याचा राज्यपालांचा संकल्प

जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत ‘कलाविष्कार २०२५’ पारितोषिक वितरण

vishwatmaklokswamivarta

शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेसाठी कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी मुदतवाढ

जिल्हास्तरीय चाचा नेहरू बालमहोत्सवाचे शानदार उद्घाटन**मुला मुलींच्या परिपूर्ण विकासासाठी क्रीडा स्पर्धा महत्वाच्या**- मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन* 

vishwatmaklokswamivarta

विशेष भारत निवडणूक आयोगाकडून ३३४ पक्षांची नोंदणी रद्द