vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधीस्थानिक बातम्या

प्रोजेक्ट महादेवा ठाणे जिल्हा निवड चाचण्या; प्रचंड उत्साह आणि फुटबॉल प्रतिभेचा आविष्कार*

प्रोजेक्ट महादेवा ठाणे जिल्हा निवड चाचण्या; प्रचंड उत्साह आणि फुटबॉल प्रतिभेचा आविष्कार*

 

    *ठाणे, खेळ प्रतिनिधी* महाराष्ट्र शासन क्रीडा विभाग, महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्र), सिडको आणि वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (WIFA) यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात फुटबॉल खेळाचा विकास, प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने “महादेवा” ही महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील युवा खेळाडूना फुटबॉलमध्ये करिअर करण्याच्या दृष्टीने प्रोत्साहन देणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे.

   या योजनेचा एक भाग म्हणून, राज्यातील 13 वर्षांखालील मुले व मुलीसाठी जिल्हा, विभाग आणि राज्य स्तरावर फुटबॉल निवड चाचण्यांचे आयोजन करण्यात येत आहे. ठाणे जिल्ह्यातील खेळाडूंची निवड चाचणी दि.01 नोव्हेंबर 2025 रोजी मुले व 02 नोव्हेंबर 2025 रोजी मुली श्री. यशवंतराव चव्हाण फुटबॉल मैदान, सेक्टर 19, नेरूळ, नवी मुंबई येथील क्रीडांगणात यशस्वीपणे आयोजित करण्यात आली. ही चाचणी जिल्हा क्रीडा अधिकारी (DSO) कार्यालय, ठाणे आणि ठाणे फुटबॉल असोसिएशन (TFA) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. दोन दिवस चाललेल्या या निवड चाचण्यांमध्ये ठाणे जिल्ह्यातील तरुण फुटबॉलपटूंनी दाखविलेला सहभाग, शिस्त आणि उत्साह पाहता ठाणे जिल्ह्यातील फुटबॉल संस्कृती व तरुण प्रतिभा विकासाबाबतची बांधिलकी अधोरेखित झाली.

  या निवड प्रक्रियेत पहिल्या दिवशी 355 मुले आणि दुसऱ्या दिवशी 64 मुली अशा एकूण 419 खेळाडूंनी सहभाग घेतला. काटेकोर निवड प्रक्रियेनंतर 20 मुले व 20 मुलींची ठाणे जिल्ह्याच्यावतीने पुढील विभागीय फेरीसाठी निवड करण्यात आली. विभागीय व त्यानंतर राज्य स्तरावर निवड होणाऱ्या खेळाडूंना दि.14 डिसेबर,2025 रोजी मुंबई येथे जागतिक कीर्तीचे फुटबॉलपटू “लिओनेल मेस्सी” यांच्यासोबत खेळण्याची एक अभूतपूर्व संधी मिळणार आहे

     या कार्यक्रमाचे मार्गदर्शन आणि देखरेख खालील मान्यवरांनी केले

     ठाणे फुटबॉल असोसिएशन सचिव सुनील पुजारी, जिल्हा क्रीडा अधिकारी, ठाणे सुवर्णा बारटक्के, क्रीडा अधिकारी, ठाणे सिद्धार्थ वाघमारे, ठाणे फुटबॉल असोसिएशन सहसचिव अमजद खान, मैच कमिशनर, WIFA शीतल रसालम.

    WIFA नियुक्त स्काउट्स हेमंत पावळे, सुप्रित जेठाणा, सम्राट राणा आणि श्रुतिलक्ष्मी व्ही.के.यांनी खेळाडूची तांत्रिक, रणनीती व शारीरिक निकषावर काटेकोर तपासणी केली.

  *ठाणे जिल्हा अंतिम निवड यादी*  अंडर – 13 मुले (जन्म 2012 च 2013) :- आर्यव्रत आशिष सरस्वत, निहार विकास नांबियार, आर्य राममूर्ती नायडू, दैविक कमलेश गलानी, रणवीर सिंह चावला, आरव चंद्रकांत सोनवणे, मल्हार लक्ष्मीकांत सावंत, अनय अमित भुसकुटे, तनिष चंद्रशेखर मल्लि, आर्यन संतोष पिंगळे, लक्ष्य नरेश मळकर, गिरीश मेनन, एफ्रॉन अॅग्नेलो डिसा, कनिष्क संजय मिश्रा, निहार कृष्ण एस, तनय रंजीत, शीहान बॅनर्जी, विहान नागधर बांदी, स्वरित संजय सातपुते व हर्षित नरेंद्र निकम    अंडर – 13 मुली (जन्म 2012 व 2013) :- स्वयमप्रभा महाराणा, जीविका राजपूत, निहारिका सुरेश, हना खान, स्वर विक्रम कुदळे, नव्या पाटील, जीविका रुपेजा, कृतिका राय, दुर्वा तर्मळे, रेबेका सिबी, समायरा सिग, कियाराह अनिरुद्ध सराफ, मन्नत धीरज आहुजा, अक्षरा आदर्श शेट्टी, आश्मी आदर्श शेट्टी, आरझू विकास कदम, लावण्य रविंद्र ठाकरे, अनु मेघा रूपेश, त्रयी प्रभाष शेट्टी व फाटक इराम शमशुद्दीन

     “प्रोजेक्ट महादेवा” हा उपक्रम महाराष्ट्रभरातील तरुण फुटबॉल प्रतिमा शोधण्यासाठी आणि त्यांना योग्य प्रशिक्षण देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरत आहे. ठाणे जिल्ह्यातील या निवड चाचण्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले की, ठाणे जिल्ह्यातील फुटबॉलची पायाभरणी मजबूत असून भविष्यात अनेक उत्कृष्ट खेळाडू राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवत्तील, असे ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के यांनी कळविले आहे.

00000

संबंधित पोस्ट

महाडिबीटी पोर्टलवरील शिष्यवृत्ती अर्ज वेळेत मंजुरीसाठी सादर करा ‘ऑटो रिजेक्ट’ अर्जांना मुदतवाढ मिळणार नाही

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पाणीपुरवठ्याबाबत अत्यंत महत्त्वाची सूचना

शेतकऱ्यांनी बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी; कृषी विभागाचे आवाह

खानापूरच्या गणेश बुरूजाचे नगरपंचायतीकडे हस्तांतरण जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले आदेश सुपूर्द- पुरातन बुरूजाच्या सुशोभिकरणातून शहराच्या वैभवात भर- देखभाल, दुरूस्तीसह वृक्षारोपणाची अट…

vishwatmaklokswamivarta

पुणे विमान नगर भागामध्ये एका पुणे महानगर पालिकेच्या माथेफिरू संजय पोल या अधिकाऱ्याने ५ वर्ष जुने श्रीराम मंदिर तोडले असता पुन्हा बांधणे सुरू

संत गजानन महाराज पालखीचे जालना शहरात आगमनभाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या हस्ते भव्य स्वागत…