vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

आंबेडकर आणि मार्क्स : समाज परिवर्तनाच्या दिशा” या विषयावर संवाद सभा

आंबेडकर आणि मार्क्स : समाज परिवर्तनाच्या दिशा” या विषयावर संवाद सभा

राज्य प्रतिनिधी -छत्रपती संभाजीनगर/प्रतिनिधी : नवनिर्माण सांस्कृतिक मंच, मुंबई आणि सत्यशोधक समाज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने “आंबेडकर आणि मार्क्स : समाज परिवर्तनाच्या दिशा” या विषयावर संवाद सभेचे आयोजन उद्या दि . ९ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत गांधी भवन, शासकीय ग्रंथालय संकुल, समर्थनगर, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे करण्यात आले आहे.

या संवाद सभेच्या अध्यक्षस्थानी अॅड. के. ई. हरिदास राहतील. कार्यक्रमास मा. ज.वि. पवार, संस्थापक सदस्य – दलित पँथर, मुंबई हे विशेष उपस्थित राहणार असून प्रमुख वक्ते म्हणून डॉ. उमेश बगाडे, प्रा. राम बाहेती आणि अॅड. उत्तम जहागीरदार सहभागी होणार आहेत.

या संवाद सभेला मोठ्या संख्येने उपस्थितीत राहण्याचे आवाहन प्रा. भारत सिरसाट, अॅड. वैशाली डोळस, इंजी. चेतन राऊत, अॅड. गौतम साळवे, डॉ. प्रकाश हिवराळे, डॉ. अरुण कांबळे, सविता अभ्यंकर, प्रवीण नाडकर, अनंत भवरेअमरदीप वानखडे आदींनी केले आहे.

संबंधित पोस्ट

कोंकण विभाग स्तरावरील प्रजासत्ताक दिन,विभागीय आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न-पोलीस दलातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांचा गौरव

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामपंचायत सिंगापूरची तालुकास्तरीय पडताळणीसुशासन, हरित गाव व नाविन्यपूर्ण उपक्रमांची समितीकडून पाहणी; कामकाजाबाबत समाधान व्यक्त

महाराष्ट्रातील धरणे तुडुंब भरली आहेत, राज्यातील २९९७ धरणांत एकूण ११६२.३६ टीएमसी पाणीसाठा नोंदवला

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांची खांद्यावरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर भेट

चिखलदरा येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात 142 उमेदवारांची प्राथमिक निवडआदिवासी तरुणांनी जागतिक स्तरावर झेप घेण्याचे आमदार केवल कुमार काळे यांचे आवाहन

भाजप आणि महायुतीवर जोरदार हल्लाबोल-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे

vishwatmaklokswamivarta