vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

राज ठाकरेंनी मित्राचा शब्द पाळला, बाबासाहेबांना दिली अनोखी भेट

राज ठाकरेंनी मित्राचा शब्द पाळला, बाबासाहेबांना दिली अनोखी भेट

प्रतिनिधी :  शिवचरित्रकार बाबासाहेब पुरंदरे यांचा आज 100 वा वाढदिवस आहे. बाबासाहेबांनी शतक गाठलं आहे. याचनिमित्ताने पुण्यात पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांचा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी अनेक दिग्गज कलाकार आणि नेत्यांनी हजेरी लावली होती.

बाबासाहेबांसोबतच्या गोड आठवणी यावेळी उपस्थित अनेकांनी सांगितल्या. गायिका आशाताई भोसले, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, भाजप आमदार आशिष शेलार सह अनेक मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. बाबासाहेबांचं सुवासिनींच्या हस्ते 99 दिव्यांनी औक्षण करण्यात आलं.आशा भोसले यांच्या हस्ते बाबासाहेबांचा सत्कार होत आहे.

ओंजळ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी राज ठाकरे यांनी देखील बाबासाहेबांसोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. विशेष म्हणजे बाबासाहेबांसाठी अनोखी भेट राज ठाकरे घेऊन आले होते.

ही भेट खरंतर त्यांच्या मित्राने तयार केली होती. राज ठाकरे यांच्या सांगण्यावरुन चित्रकार विजय राऊत यांनी बाबासाहेबांचं चित्र रेखाटलं. जे त्यांना व्यासपीठावर देण्यात आलं.

संबंधित पोस्ट

निवडणूक निरीक्षक नेहा चौधरी यांची जिल्हाधिकारी कार्यालयातील माध्यम कक्षास भेट

परळी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार धनंजय मुंडे यांच्या वाहनाला अपघात; छातीला किरकोळ मार..

जम्मू-काश्मिरहून परतलेल्या पर्यटकांशी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी साधला संवाद

केंद्र सरकारने सादर केलेल्या जीएसटी दर कपात आणि सुधारणांच्या प्रस्तावांना एकमताने संमती दिल्याबद्दल पंतप्रधानांनी जीएसटी परिषदेची केली प्रशंसा, सर्वसामान्य माणूस, शेतकरी, एमएसएमई, मध्यमवर्गीय, महिला आणि युवकांना याचा लाभ होईल

vishwatmaklokswamivarta

रिलायन्स ग्रुपचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांच्या पत्नी  कोकिलाबेन अंबानी यांची तब्येत बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक 2024-राज्यातील २८७ मतदारसंघातील एकूण ७ हजार ९६७ उमेदवारांपैकी ७ हजार ०५० उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत, तर ९१७ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले….

vishwatmaklokswamivarta