vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाकडून लघु उद्योगासाठी अर्थसहाय..

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाकडून लघु उद्योगासाठी अर्थसहाय..

            जालना प्रतिनिधी- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत यापूर्वी कोणत्याही प्रकारचा लाभ न घेतेलेल्या मातंग व तत्सम 12 पोट जाती समाजातील वैयक्तिक अर्जदारांना उद्योग, व्यवसाय करण्यासाठी प्राप्त उद्दीष्टानुसार विविध बँकांमार्फत अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्याकरीता कर्जाचे अर्ज देणे व स्वीकृतीचा कार्यक्रम कार्यालयीन वेळेत संबंधित महामंडळाचे जिल्हा कार्यालय, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जालना येथे आयोजित करण्यात आला आहे. प्रत्यक्ष अर्जदार व्यतिरिक्त इतर त्रयस्थ व्यक्तीकडून अर्ज स्विकारले जाणार नाहीत. या योजनेसाठी सन 2025- 26 या आर्थिक वर्षाकरीता प्राप्त उद्दिष्टे अनुदान कर्ज योजनेसाठी 75 व बिज भांडवल कर्ज योजनेसाठी 50 असे आहे. अर्ज स्वीकृतीच्या वेळेस अर्जदाराने सर्व मुळ कागदपत्रे, जातीचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, शिधापत्रिका, उत्पन्नाचा दाखला, कोटेशन इत्यादी कागदपत्रे बाळगावी. असे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 

-*-*-*-*-*-

 

वृत्त क्र.

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र दिनानिमित्त माधवबाग खराडी तर्फे मोफत यज्ञ चिकित्सा शिबिर

vishwatmaklokswamivarta

जागतिक हत्ती दिनानिमित्त भारताच्या समृद्ध पर्यावरणीय वारशाला सलाम..

नारी शक्तीचा अपमान करणाऱ्या कॉंग्रेस च्या नेत्याचा जाहीर निषेध – संगीताताई गोरंटयाल

vishwatmaklokswamivarta

अधिकारी -‌ कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणातील सूचनांचे काटेकोरपणे पालन करत जबाबदारी दक्षतेने पार पाडावी – निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते-जनगणना २०२७ संदर्भातील जिल्हास्तरीय प्रशिक्षणास प्रारंभ…

जिल्हाधिकारी कार्यालयात सदविचारांचे वाण-सणांद्वारे संवाद आणि संस्कार वृद्धिंगत व्हावा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

वारणा धरणात 28.23 टी.एम.सी. पाणीसाठा