vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी 18 नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी करावी …

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी 18 नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी करावी …

 सातारा प्रतिनिधी : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करणेसाठी शासनाने सदर योजने https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ई-केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. लाभार्थ्यांनी आपली ई-केवायसी 18 नोव्हेंबरपर्यंत करावी, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील यांनी केले आहे.

  ई-केवायसी अत्यंत सोपी असून स्वतः महिला आपल्या मोबाईलवरुन देखील करु शकते. ई-केवायसी करताना प्रथम महिला लाभार्थ्यांनी स्वतःचे आधार कार्ड प्रमाणीकरण करावे तदनंतर पती, वडील यांचे आधार कार्ड प्रमाणीकरण करुन घेण्यात यावे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या सर्व महिला लाभार्थ्यांनी ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. ज्या महिलांनी सदर कालावधीत ई-केवायसी केली नाही तर ते पुढील कार्यवाहीस पात्र राहतील याची नोंद घ्यावी.

योजनेच्या ज्या महिला लाभार्थ्यांची पती, वडील दोन्हीही मयत आहेत किंवा ज्या अविवाहित महिलांचे वडील मयत आहेत तसेच विधवा, घटस्पोटीत, परित्यक्त्या महिला यांचे ई-केवायसीबाबत शासनस्तरावरुन निर्णय घेणेबाबत विचार विनिमय सुरु आहे. परंतु तत्पूर्वी अशा महिलांनी फक्त त्यांचेचे आधार कार्ड प्रमाणीत करुन अपूर्ण ई-केवायसी 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत करुन घेणे आवश्यक आहे. अपूर्ण ई-केवायसी पूर्ण करुन घेणेबाबत शासनामार्फत स्वतंत्र सूचना निर्गमित करणेत येणार आहे. तसेच अशा महिलांनी परस्पर इतर नातेवाईकांचे आधार कार्ड प्रमाणीकरण करु नये, असेही आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती पाटील यांनी केले.

0000

संबंधित पोस्ट

वृद्ध शेतकरी अंबादास पवार हे त्यांच्या शेतात स्वत: नांगर ओढतानाचे छायाचित्र व्हायरल-सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची भेट

महापालिका क्षेत्रात चांगल्या दर्जाच्या नागरी सुविधा उपलब्ध करा- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- महानगरपालिका क्षेत्रातील विविध कामांचा घेतला आढावा

vishwatmaklokswamivarta

अमृत, नगरोत्थानच्या पायाभूत सुविधांच्या कामांची गती वाढवण्यासाठी महत्वाच्या सुधारणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उचलले पाऊल …प्रकल्प वेळेत पूर्ण न झाल्यास संबंधितांवर कारवाई

vishwatmaklokswamivarta

विशेष सहाय्याच्या योजनांचे अनुदान डिबीटी प्रणालीद्वारे मिळणार*- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*पुढील १०० दिवसांमध्ये सामाजिक न्याय विभागाने करावयाच्या कामाचा घेतला मुख्यमंत्र्यांनी आढावा*

कर भरणे ही समाजसेवा आहे; सर्वांनी तो अवश्य भरला पाहिजे : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन महावीर जयंती निमित्त ‘महावीर स्वामी जन्म कल्याणक’ महोत्सव

पोलीस दल अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न करू- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- सांगली ग्रामीण पोलीस ठाणे विस्तारीत पहिल्या मजल्याचे लोकार्पण..