vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सह्याद्री व्याघ्र व चांदोली राष्ट्रीय उद्यानातील बाधीत गावांच्या पुनर्वसनाच्या कामांचा**जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी घेतला आढावा*

*सह्याद्री व्याघ्र व चांदोली राष्ट्रीय उद्यानातील बाधीत गावांच्या पुनर्वसनाच्या कामांचा**जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी घेतला आढावा*

सातारा, प्रतिनिधी : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत अभयारण्य व चांदोली राष्ट्रीय उद्यानातील बाधीत गावांच्या पुनर्वसनाच्या कामांचा आढावा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी घेऊन या कामांना गती द्यावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीला अपर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, जिल्हा पुनर्वसन अधिकारी मनोहर गव्हाड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.

शहापूर, धोंडेवाडी, बाबरमाची येथील नागरी सुविधेंतर्गत 27 कामांच्या आढावा घेण्यात आला. पुनर्वसन अधिनियम 1999 तसेच महसूल व वन विभागाडील शासन निर्णयाप्रमाणे नमूद केल्याप्रमाणे नागरी सुविधा देण्यात याव्यात. यावेळी त्यांनी पिण्याचे पाणी, शाळा, खेळाचे मैदान, ग्रामपंचायत कार्यालय, समाज मंदिरे, रस्ते, शेत जमिनीतून जाणारी पायवाट, वीज पुरवठा, गटारे, शौचालय, बस स्टॅन्ड, गोठे, दवाखाने, उद्याने, पोस्ट ऑफीस आदी सुविधांचा आढावा घेतला.

बाबरमाची येथील जी कामे प्रस्तावित आहेत त्यांना एक महिन्यात तांत्रिक मंजुरी घेऊन कामांना सुरुवात करावी. तसेच विद्युत वितरण कंपनीने या ठिकाणचे काम खर्चाच्या अंदाजपत्रकानुसारच करावे आणि येथील शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटवावा, असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले.

 वेळे ता. जावली येथील खातेदारांची शेत जमिनीचा सात बारा व नकाशा त्यांना जागेवर जावून वाटप करावयाचा आहे हे कामही येत्या एक महिन्यात पूर्ण करावे. तसेच येथील नागरी सुविधांच्या कामाची आचार संहिता संपल्यानंतर निवीदा प्रक्रिया राबवावी.

 देऊर ता. जावली येथील भूखंड मोजणी, वाटप, शेती भूखंड याबाबत कार्यवाही प्रलंबित आहे हेही काम एक महिन्यात पूर्ण करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी केल्या.

या बैठकीमध्ये मौजे बोपेगाव, मळे व बहुले येथील पुनर्वसनाच्या कामाचाही आढावा घेण्यात आला. तसेच पाथारपुंज येथील पुनर्वसनाबाबत चर्चा करण्यात आली. पाथारपुंजचा बंदी दिनांकाचा महत्वाचा विषय मार्गी लागला असून पुनर्वसनाला गती देण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी बैठकीत सांगितले.

0000

संबंधित पोस्ट

जि.प. ठाणे अंतर्गत ‘राष्ट्रीय पंचायत राज दिवसानिमित्त विशेष ग्रामसभा व जनजागृती उपक्रमांचे आयोजन..ग्रामसभा व जनजागृती उपक्रमांमध्ये ग्रामस्थांना सहभागी होण्यासाठी जिल्हा परिषदेचे आवाहन..

राज्य व जिल्हा यंत्रणांनी संपर्कात राहून समन्वयानं नागरिकांच्या बचाव व मदतकार्याला प्राधान्य द्यावं -मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांची प्रशासनाला सूचना शेती, पिके, पशुधन, घरांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रशासनाला निर्देश

ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षा २०२५ चा निकाल जाहीर

vishwatmaklokswamivarta

पुणे येथील‘खडकवासला जलाशय रक्षण’अभियान 23 व्या वर्षीही शतप्रतिशत यशस्वी !निसर्गाचा ऱ्हास न होता त्याचे संरक्षण झाले पाहिजे ! – भीमराव अण्णा तापकीर, भाजप आमदार, खडकवासला मतदारसंघ

रायगडमध्ये 14 फेब्रुवारीला शासकीय योजनांचा महामेळावा- विधी सेवा शिबिर, एकाच छताखाली सर्व सेवा उपलब्ध

vishwatmaklokswamivarta

जालना सहकारी साखर कारखान्यातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश

vishwatmaklokswamivarta