vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हा रुग्णालयात अवयवदान जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न; अवयवदान ही मानवतेची सर्वोच्च सेवा असल्याचा संदेश…

जिल्हा रुग्णालयात अवयवदान जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न; अवयवदान ही मानवतेची सर्वोच्च सेवा असल्याचा संदेश…

बुलढाणा, प्रतिनिधी): येथील जिल्हा रुग्णालय आणि बजाज हॉस्पिटल, संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अवयवदान जनजागृती कार्यक्रम दि. 12 नोव्हेंबर 2025 रोजी जिल्हा रुग्णालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. समाजामध्ये अवयवदानाबाबत जागृती वाढविणे आणि त्याचे महत्त्व समजावून देणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

     या प्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉ. कैलास झिने, वैद्यकीय अधीक्षक डॉ. घोटे, नेत्रतज्ञ डॉ. रवी शिंदे, बजाज हॉस्पिटल, संभाजीनगर येथील डॉ. रोडे, (बाह्य रुग्ण विभाग) वैद्यकीय अधिकारी डॉ. घोंगटे, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी, नेत्र समुपदेशक योगेश सिरसाट, श्री. जाधव तसेच अन्य मान्यवरांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमात तज्ञांनी अवयवदानाचे सामाजिक, वैद्यकीय आणि मानवी मूल्यांवरील महत्त्व पटवून दिले. मृत्यूनंतरही अवयवदानाद्वारे अनेकांचे प्राण वाचू शकतात, हा अत्यंत संवेदनशील व प्रेरणादायी संदेश नागरिकांना देण्यात आला. अवयवदानाबाबतच्या विविध प्रक्रियांची माहिती, त्यावरील गैरसमज दूर करणे आणि सामान्य जनतेमध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याचे मार्गदर्शनही कार्यक्रमात करण्यात आले.

 

00000

संबंधित पोस्ट

आयुष्मान भारत व वय वंदना कार्ड ई-केवायसी मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादमागील ७ दिवसांत १७,१२० आयुष्मान कार्ड व १,२९३ वय वंदना कार्ड लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण

सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ, ठाणे संस्थेच्यावतीने पितृछत्र हरपलेल्या विद्याथी दत्तक योजना2 ऑगस्ट रोजी गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून माणुसकीची दिवाळी-पूरग्रस्तांच्या मदतीसाठी क्यू आर कोड द्वारे अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केले स्वेच्छा निधी संकलन

vishwatmaklokswamivarta

शहर विकास आराखड्यातील आरक्षित जागेवर भव्य उद्यान, मैदान व नाट्यगृहउभारावे; आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या माध्यमातून नगर विकास विभागाचानिधी उपलब्ध करू – नगरसेवक अश्विन अंबेकर

वृक्षारोपण व संवर्धन सामाजिक जबाबदारी- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने वृक्ष उत्पादक आणि वृक्ष खरेदीदार मेळावा.

vishwatmaklokswamivarta

बाळासाहेब तनपुरे यांचा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश