vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मांडवा जेट्टी ते अलिबाग मार्गावर वाहतूक बंदी अधिसूचना जारी..

मांडवा जेट्टी ते अलिबाग मार्गावर वाहतूक बंदी अधिसूचना जारी..

रायगड-अलिबाग प्रतिनिधी :- मांडवा जेट्टी ते अलिबाग मार्गावरील अपघात कमी होण्यासाठी तसेच स्थानिक नागरिक,विद्यार्थी व पर्यटक यांचा प्रवास सुखकर होण्याच्या दृष्टीकोनातून तसेच अपघाताचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने उपाययोजना म्हणून मांडवा जेट्टी ते अलिबाग या मार्गावर दररोज सकाळी 08.00 वा. ते दु. 12.00 वा.पर्यंत तसेच सायं.16.00 ते रात्री 20.00 वा.पर्यंत या अधिसूचनेच्या दिनांकापासून ते पुढील आदेश होईपर्यंत जड अवजड वाहनांकरिता (दुध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस, औषधे, ऑक्सीजन, भाजीपाला, पाणी इत्यादी जिवनावश्यक वस्तू वाहून नेणाऱ्या वाहनांना वगळून) जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी वाहतूकबंदी अधिसूचना जारी केली आहे.

रायगड जिल्हा हा पर्यटक जिल्हा असल्याने अलिबाग, मांडवा, किहिम, आक्षी, नागाव येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक आपआपली वाहने घेऊन येत असतात. पर्यटकांची वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. मांडवा जेट्टी ते अलिबाग हा रस्ता अरुंद असून या मार्गावर मोठ्या प्रमाणात डंपर व ट्रक मातीची/खडीची वाहतूक करणारी वाहने व सिमेंट कॉन्क्रीटीकरणाकरीता सिमेंट मिक्सर, इतर सामनांची वाहतूक करणारे अवजड वाहने जात येत असतात. त्यातच मांडवा जेट्टी येथे जलप्रवासी वाहतूक बोटी तसेच रो-रो सेवा सुरु असल्याने त्यामधून देखील मुंबई येथून पर्यटकांची मोठ्या प्रमाणात वाहने येत असतात. त्यामुळे मांडवा जेट्टी हा रस्ता अरुंद असल्यामूळे वाहतुक कोंडी होऊन या मार्गावर नेहमी किरकोळ, गंभीर व प्राणांतिक अपघात होत असून या अपघातांमध्ये वाढ होत आहे. तसेच दर शनिवार व रविवार या दिवशी मुंबई येथून पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून विद्यार्थी तसेच पर्यटकांना प्रवासाकरीता जास्तीचा वेळ लागतो. तसेच आजारी रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिका या वाहतूक कोंडीमध्ये अडकून पडल्याने रुग्णाच्या जिवितास धोका संभावू शकतो.

 ही वाहतूक बंदी अधिसूचना ही दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस, औषधे, ऑक्सीजन, भाजीपाला, पाणी इत्यादी जिवनावश्यक वस्तू वाहन नेणारी वाहने, पोलीस वाहने, फायर ब्रिगेड वाहने रुग्णवाहीका यांना लागू राहणार नाही.

00000

संबंधित पोस्ट

पाणी टंचाई निवारणार्थ बुलढाणा तालुक्यातील पाच गावांसाठी टँकर मंजूर

कोकण भवनात भारतीय प्रजासत्ताक दिन पूर्व तयारीची बैठक संपन्न

सर्वसामान्यांचे जीवन सुकर होण्यासाठी प्रयत्न करावेत- पालक सचिव विनिता वेद सिंग,100 दिवस कृती आराखड्यांतर्गत घेतला प्रमुख विभागांच्या कामांचा आढावा

vishwatmaklokswamivarta

जालना येथे धनगर समाजाचा भव्य आरक्षण मोर्चा संपन्न

vishwatmaklokswamivarta

नियमांचे काटेकोर पालन करून बकरी ईद सण उत्साहात साजरा करावा- जिल्हाधिकारी अशोक काकडे-जिल्हा प्राणीक्लेष प्रतिबंधक समितीच्या बैठकीत निर्देश

शिक्षिकेची मरणोत्तर सामाजिक बांधिलकी- मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 5 लाखांची देणगी