vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी

ठाणे, प्रतिनिधी:- भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना Service Selection Board (SSB) या परिक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतीसाठी दि.15 डिसेंबर 2025 ते दि. 24 डिसेंबर 2025 या कालावधीत SSB कोर्स क्रमांक 64 आयोजित करण्यात येत आहे. कोर्स कालावधीत प्रशिक्षनार्थीना निःशुल्क प्रशिक्षण, निवास व भोजन दिले जाते.

  तरी ठाणे व पालघर जिल्ह्यातील इच्छुक उमेद्वारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय ठाणे येथे दि. 12 डिसेंबर 2025 रोजी मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येतेवेळी त्यांनी Department of Sainik Welfare, Pune (DSW) यांच्या वेबसाईटवर सर्च करुन त्यामधील SSB-64 कोर्ससाठी (किंवा संबंधीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोवत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेवून व ते पूर्ण भरून सोबत घेऊन यावे.

या SSB वर्गामध्ये प्रवेश मिळण्यासाठी खाली नमूद कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे व त्यासंबंधीचे पात्रता प्रमाणपत्र कोर्सला येताना सोबत घेवून यावेत :-(अ) कंबाइंड डिफेन्स सर्व्हीसेस एक्झामिनेशन (CDSE-UPSC) अथवा नॅशनल डिफेंस अॅकेडमी एक्झामिनेशन (NDA-UPSC) पास झालेली असावी व त्यासाठी सर्व्हीसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे.(ब) एनसीसी ‘C’ सर्टिफीकेट ‘A’ किंवा ‘B’ ग्रेड मध्ये पास झालेले असावेत व एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एसएसबी साठी शीफारस केलेली असावी.        (क) टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एसएसबी मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे.(ड) विद्यापीठ प्रवेश प्रणाली (University Entry Scheme) साठी एसएसबी कॉल लेटर असावे किंवा SSB साठी शीफारस केलेल्या यादीत नांव असावे.       अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ई-मेल आय डी: training.pctcnashik@gmail.com व दूरध्वनी क्र.0253-2451032 किंवा व्हाट्सअॅप क्र.9156073306 असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ठाणे/पालघर यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

कौशल्य विकास केंद्राचा मंगळवारी टीसीएस प्लेसमेंट ड्राईव्ह

शासकीय तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी कर्मचाऱ्यांची त्रैमासिक सांख्यिकी (ER 1) माहिती ऑनलाईन पध्दतीने सादर करावी…

vishwatmaklokswamivarta

जालना येथे अनिवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

व्यवसाय सुरु करण्यासाठी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन*

आरसेटीच्या वार्षिक प्रशिक्षणाचा कार्यक्रम जाहिर

जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांकरिता महाड येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन