vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

उपविभाग भामरागड : फुलनार (कॅम्प गुंडूरवाही) येथे नवीन पोलीस मदत केंद्राची स्थापना

उपविभाग भामरागड : फुलनार (कॅम्प गुंडूरवाही) येथे नवीन पोलीस मदत केंद्राची स्थापना

गडचिरोली प्रतिनिधी-उपविभाग भामरागड : फुलनार (कॅम्प गुंडूरवाही) येथे नवीन पोलीस मदत केंद्राची स्थापनाअवघ्या 24 तासांत उभारलेले अत्याधुनिक पोलीस मदत केंद्र —1000 सी–60 कमांडो, 21 BDDS टीम, नवनियुक्त पोलीस जवान, 500 विशेष पोलीस अधिकारी आणि खाजगी कंत्राटदार यांचे संयुक्त प्रयत्न!2023 नंतर सुरक्षा पोकळी भरून काढण्यासाठी सुरू असलेल्या शृंखलेतील हे आठवे पोलीस मदत केंद्र

राज्य शासनाने 28/10/2025 रोजी फुलनार (कॅम्प गुंडूरवाही) येथे स्थापना करण्यास दिलेली होती औपचारिक मंजुरी. फुलनार (कॅम्प गुंडूरवाही) येथे पोलीस मदत केंद्राच्या उभारणीदरम्यान आयोजित जनजागरण मेळाव्यात स्थानिक नागरिकांना विविध साहित्यांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमात उपस्थित महिलांना साड्या व चप्पल देण्यात आल्या, तर पुरुषांना घमेले, ब्लॅंकेट, स्वयंपाकातील भांड्यांचा संच आणि मच्छरदानीचे वाटप करण्यात आले. युवकांना लोअर पॅन्ट, टी-शर्ट, नोटबुक, पेन, स्कूल बॅग, कंपास तसेच चॉकलेट व बिस्कीट देऊन प्रोत्साहन देण्यात आले. लहान मुलांसाठी क्रिकेट बॅट, बॉल, स्टंप संच, व्हॉलीबॉल नेट आणि व्हॉलीबॉल देत पोलिसांनी क्रीडा व व्यक्तिमत्त्व विकासालाही चालना दिली. नागरिकांशी थेट संवाद साधत विश्वास, सुरक्षा आणि समाजाभिमुख सहभाग वाढवण्याचा हा उपक्रम विशेषतः यशस्वी ठरला

0000

संबंधित पोस्ट

औद्योगिक कंपन्यांमधून मोठ्या संख्येने उपलब्ध असलेल्या रोजगार संधींचा लाभ घेण्यासाठी युवक-युवतींनी पुढाकार घ्यायला हवा – धनंजय साजेकर रोजगार मेळाव्यात १२० उमेवारांची नावनोंदणी

जिल्ह्यातील विविध बँकांमध्ये दाव्याविना 176 कोटी रुपये पडून दावा न केलेल्या ठेवी परत मिळवण्यासाठीची मोहीम..

vishwatmaklokswamivarta

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करण्यासाठी 30 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढइयत्ता 11 वी, 12 वी तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना दिलासा

vishwatmaklokswamivarta

जिल्हा युवा महोत्सव उत्साहात संपन्न 

vishwatmaklokswamivarta

मूल्याधिष्ठित पत्रकारिता देशाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

धारावी झेंडा ग्रुप तर्फे 134 लाडू वाटून डॉक्टर आंबेडकर जयंती उत्साहात संपन्न.