vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

आता भारत व युरोप यांच्यात युपीआयसह व्यवहार शक्य? आरबीआयकडून मोठी माहिती समोर

प्रतिनिधी:आरबीआयच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की आरबीआय केवळ भारतात नाही तर परदेशातही युपीआय (Unified Payment Interface UPI) माध्यमातून व्यवहार सुरळित, सुरक्षित, सोपे, सुकर व्हावे यासाठी परकीय देशातील वित्तीय प्रणालींशी सहकार्य करत नव्या इंटरलिंकेजसाठी कार्यरत आहे असे आरबीआयने म्हटले आहे. माहितीनुसार, आरबीआय (Reserve Bank of India), व एनपीसीआय (National Payments Corporation of India NPCI) यांच्या आसपासातील सहकार्यासह युरोपियन सेंट्रल बँकेशी सहकार्य करत एकत्रित युपीआय कनेक्ट करण्यासाठी मोठ्या पातळीवर बोलणी करत आहे. टार्गेट इन्स्टंट पेमेंट सेटलमेंट (TIPS) प्रणालीतून हे भविष्यात शक्य होऊ शकते.

खासकरून युरोपियन प्रदेशातील नागरिक व भारतातील नागरिक यांच्या वाढत्या प्रतिनिधित्वातून वाढलेला व्यवहार पाहता परदेशी युपीआय सुरु झाल्यास मोठ्या प्रमाणात व्यापारांसह ग्राहकांना दिलासा मिळेल यासाठी आरबीआय प्रयत्न करत आहे. त्यामुळे आता पैसे पाठवण्याची सु़विधा सुकर होऊ शकते.

याविषयी बोलताना आरबीआयने आपल्या नोटिफिकेशनमध्ये म्हटले आहे की,’युरोसिस्टमद्वारे चालवल्या जाणाऱ्या इन्स्टंट पेमेंट सिस्टम, टार्गेट इन्स्टंट पेमेंट सेटलमेंट (TIPS) शी UPI ला जोडण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि NPCI इंटरनॅशनल पेमेंट्स लिमिटेड (NIPL) युरोपियन सेंट्रल बँकेशी संपर्क साधत आहेत. रचनात्मक आणि शाश्वत सहभागानंतर, दोन्ही बाजूंनी UPI-TIPS लिंकसाठी अंमलबजावणीचा टप्पा सुरू करण्यास सहमती दर्शविली आहे.प्रस्तावित UPI-TIPS इंटरलिंकेजचा उद्देश भारत आणि युरो क्षेत्रामधील सीमापार रेमिटन्स सुलभ करणे आहे आणि दोन्ही अधिकारक्षेत्रांच्या वापरकर्त्यांना त्याचा फायदा होईल अशी अपेक्षा आहे.

तांत्रिक एकात्मता, जोखीम व्यवस्थापन आणि सेटलमेंट व्यवस्था यासह UPI-TIPS लिंक कार्यान्वित करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि NIPL युरोपियन सेंट्रल बँकेशी जवळून सहकार्य करत राहतील.’

संबंधित पोस्ट

कॉफी विथ कलेक्टर उपक्रमात जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद**अपयशाने खचू नका, नव्या दमाने उभे राहा; तरुण पिढी देशाचे भविष्य: जिल्हाधिकारी संतोष पाटील*

दिव्यांगांनी पोर्टलच्या माध्यमातून विविध योजना व सेवांचा लाभ घ्यावा – देविदास कोकाटे दिव्यांग उमेदवारांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळातर्फे कार्यशाळेचे आयोजन

केंद्रीय आरोग्य सेवा योजनेच्या दरांमध्ये सुधारणा करणार – केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया

भारतीय लोकशाही अबाधित राहण्यासाठी सर्वांचे सहकार्य महत्त्वाचे – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन प्रत्येक भारतीयाच्या मनात प्रबळ लोकशाहीची बीजे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस · आणीबाणीच्या ५० वर्षानिमित्ताने संविधान हत्या दिवस कार्यक्रम · लोकतंत्र सेनानींचा सत्कार मुंबई, दि. २५ : देशातील लोकशाही ही सर्वोत्तम यंत्रणा आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात लोकशाहीने महत्वपूर्ण भूमिका बजाविली आहे. सध्या भारत जगातील सर्वात मोठी चौथी अर्थव्यवस्था बनला आहे. भारताच्या या वेगवान विकासात लोकशाहीने आपले महत्व अधोरेखित केले आहे. भारतीय परंपरेत मुळे असणारी लोकशाही अबाधित राहण्यासाठी आपण सर्वांनीच सहकार्य करूया, असे आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले. आणीबाणीला ५० वर्ष पूर्ण – भारतीय इतिहासातील काळाकुट्ट अध्याय, संविधान हत्या दिवस २०२५ निमित्ताने लोकतंत्र सेनानींच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन राजभवन येथील दरबार सभागृहात करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार, आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक उईके उपस्थित होते. आणीबाणी ही प्रत्येक भारतीयाच्या मनातील सल असल्याचे सांगत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन म्हणाले, आणीबाणी ही देशावर लादली गेली. या काळात देशविघातक कार्य झाले. जो कुणी आणीबाणीचा विरोध करेल त्याला कारागृहात डांबले जायचे. असह्य अत्याचार त्या काळात नागरिकांना सहन करावे लागले. आणीबाणीमुळे देशातील लोकशाहीवरच घाला घालण्यात आला. राज्यघटनेने दिलेल्या मुलभूत अधिकारांवर गदा आणण्यात आली. त्यातूनच आणीबाणीविरोधात जनमत तयार झाले. आपल्या विचारात, कार्यात व भविष्यातील योजनांमध्ये राष्ट्र प्रथम असले पाहिजे. स्वत:साठी न जगता राष्ट्रासाठी जगता आले पाहिजे. दुसऱ्यांसाठी जगा, हा मंत्र भारतीय लोकशाहीने दिला आहे. आज जगामध्ये सर्वात मोठी लोकशाही असणारा आपला भारत देश आहे. भारत विकसित होण्याकडे आगेकूच करीत आहे. विकासाच्या प्रवासाचा इथपर्यंतचा टप्पा हा मजबूत लोकशाहीमुळेच शक्य झाला आहे, त्यामुळे लोकशाहीला अधिकाधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक भारतीयाने निश्चय केला पाहिजे, असे आवाहनही राज्यपालांनी यावेळी केले. प्रत्येक भारतीयाच्या मनात प्रबळ लोकशाहीची बीजे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणीबाणी ही भारतीय लोकशाहीवरील हल्ल्याचा प्रयत्न होता. मात्र लोकतंत्र सेनानींनी मोठा लढा देत हा प्रयत्न हाणून पाडला. त्यासाठी सेनानींना मोठा संघर्ष करावा लागला. या लोकतंत्र सेनानींना सन्मानाच्या, कृतज्ञतेच्या भावनेतून मानधन देवून शासन त्यांचे ऋण फेडण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रत्येक भारतीयाच्या मनात प्रबळ लोकशाहीची बिजे रोवली आहेत. आणि म्हणूनच आणीबाणीमुळे सेनानींचे कुठल्याही प्रकारचे मानसिक खच्चीकरण होवू शकले नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकतंत्र सेनानींचा गौरव केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशभरात सुधारणांसाठी आणीबाणीपूर्वी अनेक आंदोलने सुरू होती. या आंदोलनांचा धसका घेत तत्कालीन राजवटीने देशावर आणीबाणी लादली. ही आणीबाणी संविधानाच्या हत्येचे पातक ठरली. ४२ व्या घटनादुरूस्तीने संविधानाचा आत्माच काढण्याचे प्रयत्न झाले. मुलभूत अधिकार गोठवित मार्गदर्शक तत्वांना महत्व दिले गेले. या काळात भारतीय न्यायव्यवस्थेचेही महत्व कमी करण्यात आले.

जिल्ह्यात दोन दिवसासाठी यलो अलर्ट जारी विजेच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता