vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञानप्रदेश

कृषि क्षेत्रात कृत्रिम बुध्दिमत्ता वापर प्रोत्साहन योजनेचे अर्ज पंचायत समितीत उपलब्ध    – कृषि विकास अधिकारी मनोजकुमार वेताळ

कृषि क्षेत्रात कृत्रिम बुध्दिमत्ता वापर प्रोत्साहन योजनेचे अर्ज पंचायत समितीत उपलब्ध    – कृषि विकास अधिकारी मनोजकुमार वेताळ

सांगली, प्रतिनिधी जिल्हा परिषद सांगली कडील कृषि विभागाच्या स्वीय निधी योजनेतून कृषि क्षेत्रात AI (कृत्रिम बुध्दिमत्ता) वापर प्रोत्साहन योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेच्या अर्जाचा नमुना पंचायत समिती कृषी विभाग येथे उपलब्ध असून जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांनी त्यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी मनोजकुमार वेताळ यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

       जिल्हा परिषद स्वीय निधी सन-2025-26 मधून कृषि क्षेत्रात AI (कृत्रिम बुध्दिमत्ता) वापर प्रोत्साहन योजनेसाठी रक्कम रुपये 5 हजार किंवा किंमतीच्या 50 टक्के यापैकी जे कमी असेल ते प्रति शेतकरी अनुदान देय राहील. शेतकऱ्यांनी नजीकच्या पंचायत समितीमध्ये विहित नमुन्यातील अर्ज 7/12 उतारा, खातेउतारा, आधार कार्ड आणि अर्जाप्रमाणे इतर कागदपत्रे जोडून आपला अर्ज दि. 1 डिसेंबर 2025 पर्यंत पंचायत समिती कार्यलयामध्ये सादर करावा, असे आवाहनही श्री. वेताळ यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा तीव्र होत असून, तो उद्या ‘मोंथा’ चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता. भारतीय हवामान विभागानुसार, हे चक्रीवादळ मंगळवारी संध्याकाळी किंवा रात्री आंध्र प्रदेशातील काकीनाडाजवळ किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता….

vishwatmaklokswamivarta

डोंगरी भागातील लोकांना विविध ठिकाणच्या संस्कृतींची अनुभूती देणारा कोयना दौलत डोंगरी महोत्सव- पालकमंत्री शंभूराज देसाई

अमरनाथ यात्रेला भक्तांचा जत्था रवाना..

पुस्तकांचे गाव’ उपक्रमाचे प्रभावी नियोजन करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

शारीरिक, मानसिकदृष्ट्या भक्कम राहण्यासाठी योग साधना आवश्यक – ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे- जिल्हा परिषदेने योग दिनी साधला विश्वविक्रमी भक्तियोग- चितळे डेअरी आणि विश्व योगदर्शन केंद्र यांच्यासह संयुक्त उपक्रम- ⁠जवळपास साडेपाच लाख योगप्रेमींचा सहभाग- ⁠एकाच वेळी तीन विश्वविक्रमांना गवसणी- ⁠वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंद- ग्रामीण भागातून भरभरून प्रतिसाद…