vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

नगरपरिषद, नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक-2025 मतदान केंद्र असलेल्या शाळा, महाविद्यालयांना सोमवारी सुट्टी…

नगरपरिषद, नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक-2025 मतदान केंद्र असलेल्या शाळा, महाविद्यालयांना सोमवारी सुट्टी…

 सांगली, प्रतिनिधी : नगरपरिषद, नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दिनांक 02 डिसेंबर 2025 रोजी प्रत्यक्ष मतदान होणार असून, मतदान अधिकारी मतदान साहित्य घेवून दिनांक 01 डिसेंबर 2025 रोजी मतदान केंद्रावर पोहोचणार आहेत. या अनुषंगाने सांगली जिल्ह्यातील उरूण-ईश्वरपूर, विटा, आष्टा, तासगाव, जत, पलूस नगरपरिषद व शिराळा, आटपाडी नगरपंचायत क्षेत्रातील मतदान केंद्र असलेल्या शाळा, विद्यालय, महाविद्यालय यांना सोमवार, दिनांक 01 डिसेंबर 2025 रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली असल्याचे आदेश जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी जारी केले आहेत.

 सांगली जिल्ह्यातील उरूण-ईश्वरपूर, विटा, आष्टा, तासगाव, जत, पलूस नगरपरिषद व शिराळा, आटपाडी नगरपंचायत यांचा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. यासाठी दिनांक 02 डिसेंबर 2025 रोजी मतदान होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाकडील दि. 11 नोव्हेंबर 2008 च्या आदेशानुसार ज्या दिवशी मतदान अधिकारी/कर्मचारी सर्व मतदान साहित्य घेवून मतदान केंद्राचा ताबा घेतात, त्या दिवशी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हद्दीतील शाळांना सुट्टी देणे आवश्यक आहे. तसेच मतदानाच्या दिवशीसुध्दा शाळांना सुट्टी राहील, याची खात्री करण्याची यावी, असे नमूद आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र शासन राजपत्र अधिसूचना दि. 26 नोव्हेंबर 2025 अन्वये संबंधित नगरपरिषद/नगरपंचायत क्षेत्रामध्ये दिनांक 02 डिसेंबर 2025 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मतदान अधिकारी मतदान साहित्य घेवून दिनांक 01 डिसेंबर, 2025 रोजी मतदान केंद्रावर पोहोचणार असल्याने मतदान केंद्र असलेल्या शाळा, विद्यालय, महाविद्यालय यांना सोमवार, दिनांक 01 डिसेंबर 2025 रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

00000

संबंधित पोस्ट

इमाव, विजाभज, विमाप्र प्रवर्गांसाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेचे प्रस्ताव इमाव कल्याण विभागाकडे मागविले

vishwatmaklokswamivarta

अतिधोकादायक इमारतींतील रहिवाश्यांच्या स्थलांतरासाठी ठोस पर्याय– मंत्री शंभूराज देसाई भाडेकरू संक्रमण शिबिरात जाण्यास तयार नसलेल्यांना ₹२०,००० भाडे प्रतिमाह

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना;कन्नड तालुक्यात ६० लाभार्थ्यांना ९१ हे.जमिनीचे वाटप..

महाराष्ट्र बोर्ड बारावीचा निकाल जाहीर-आज जाहीर झालेल्या निकालानुसार, 13 लाख 2 हजार 873 विद्यार्थी पास, आजच्या निकालामध्ये कोकण विभाग अव्वल ठरले आहे तर सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा लागला आहे.

vishwatmaklokswamivarta

बेकायदेशीर बेटिंग ॲप्लिकेशन्सचा प्रचार केल्याबद्दल सक्त वसुली संचालनालयाकडून २९ जणांविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल. या आरोपींमध्ये प्रकाश राज, विजय देवरकोंडा, राणा दुगुपट्टी, निधी अग्रवाल, प्रणिता सुभाष या प्रसिद्ध कलाकारांसह इन्फ्लुएन्सर आणि युट्युबर्सचा समावेश

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार गावे पाणीदार बनवा; जनजागृतीसाठी ‘जलरथ’ रवाना..