vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

कुष्ठरुग्ण शोध अभियान; जिल्हास्तरीय आढावा बैठक संपन्न-कुष्ठरुग्णांचा शोध घेऊन उपचार करा- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गीते

कुष्ठरुग्ण शोध अभियान; जिल्हास्तरीय आढावा बैठक संपन्न-कुष्ठरुग्णांचा शोध घेऊन उपचार करा- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गीते

 

बुलढाणा, प्रतिनिधी: कुष्ठरुग्ण शोध अभियानांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय व तालुकानिहाय आढावा घेण्यात आला. यावेळी कुष्ठरुग्ण शोध मोहिम अंतर्गत सर्व नागरिकांची तपासणी करावी, जास्तीत जास्त संशयित रुग्ण शोधून त्यांचे स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून निदान निश्चित करावा. नव्याने आढळणाऱ्या कुष्ठरुग्णांना त्वरित उपचार सुरू करावा, अशा सूचना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते यांनी तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांना दिल्या.

जिल्हा परिषदच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय आढावा बैठक नुकतीच घेण्यात आली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. के. व्ही. राठोड, सहाय्यक संचालक डॉ. हरी पवार, तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. डॉ. के. व्ही. राठोड यांनी कुष्ठरोग आजार, त्याचे निदान, उपचार पद्धती तसेच चालू अभियानातील तांत्रिक बाबींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

0000

संबंधित पोस्ट

नवी मुंबईत हिवताप – डेंग्यू विषयक जनजागृती शिबिरांचे प्रभावी नियोजन

नवी मुंबई महानगरपालिका प्रसिध्दीकरिता- 67 हजार पेक्षा जास्त नागरिकांनी घेतला मलेरिया – डेंग्यू प्रतिबंधात्मक जाहीर शिबीरांचा लाभ

15 जूनला नवी मुंबईत विविध आरोग्य सुविधांचे लोकार्पण व शुभारंभ

बालकांच्या मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

ग्रामीण भागातील रुग्णांना ‘हब आणि स्पोक’ प्रणाली द्वारे ‘रिमोट रोबोटिक न्यूरोइंटरव्हेन्शन’ सुविधा देण्यात येणार आहे-आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबईत एचपीव्ही लसीकरण मोहीमेचा महापौर श्रीम.सुजाता पाटील यांच्या उपस्थितीत आरंभ,गर्भाशयाच्या कर्करोगाला प्रतिबंध करणारी एचपीव्ही लस सर्व नमुंमपा रुग्णालये व नागरी आरोग्य केंद्रात मोफत उपलब्ध