vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

नक्षलग्रस्त व अतिदुर्गम भागातील मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवासमावेशाचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करणार सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

नक्षलग्रस्त व अतिदुर्गम भागातील मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवासमावेशाचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करणार -सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश..

मुंबई, प्रतिनिधी: राज्यातील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त आदिवासी जिल्ह्यांमध्ये कार्यरत मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवासमावेशाचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी सादर करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.आरोग्य भवन येथे आरोग्य मंत्री आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी आरोग्य सेवा सचिव डॉ. निपुण विनायक व ई. रवींद्रन, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, यांच्यासह आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सार्वजनिक आरोग्य विभागात वैद्यकीय आरोग्य सेवा गट- ब (बीएएमएस) हे पद असून, या पदावर सेवा प्रवेश नियमानुसार दहा वर्षे सेवा पूर्ण झालेल्या मानसेवी वैद्यकीय अधिकारी यांना सामावून घेण्याबाबत प्रस्ताव मंत्रीमंडळासमोर सादर करण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नवसंजीवनी योजनेअंतर्गत 1995 पासून राज्यात मानसेवी वैद्यकीय अधिकारी कार्यरत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

०००

संबंधित पोस्ट

आपत्तीग्रस्तांसाठी केंद्र सरकार ने महाराष्ट्राला आर्थिक मदत जाहीर

vishwatmaklokswamivarta

सामाजिक वनीकरण विभागाचा उपक्रम;वृक्ष उत्पादक व खरेदीदार मेळाव्यात ४४९ जणांचा सहभाग

vishwatmaklokswamivarta

पैठण शहरातील विविध विकास कामे कालमर्यादेत पूर्ण करावीत- नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

राष्ट्रीय सुरक्षा दल (NSG) यांच्या वतीने सायक्लोथॉनव्दारे व्यापक ‘गर्भाशय कर्करोग जनजागृती’

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या अनुषंगाने अंतिम मतदार यादी सुधारित कार्यक्रम जाहीर-विक्रांत चव्हाण-उपजिल्हाधिकारी (महसूल)

vishwatmaklokswamivarta

उमेदच्या वतीने गुरूवारपासून पाचदिवसीय मिनी सरस प्रदर्शन  

vishwatmaklokswamivarta