vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मुख्यमंत्री सहाय्यता निधीत आतापर्यंतजिल्ह्याचे योगदान सव्वा तीन कोटी रुपयांचे

मुख्यमंत्री सहाय्यता निधीत आतापर्यंतजिल्ह्याचे योगदान सव्वा तीन कोटी रुपयांचे

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- एकमेका साह्य करु अवघे धरु सुपंथ या उक्तिप्रमाणे जिल्हावासीय जिल्ह्यातील अतिवृष्टिग्रस्तांच्या मदतीला धावून आल्याचे चित्र आहे. अतिवृष्टीमुळे बाधीत झालेल्या आपल्या शेतकरी कष्टकरी बांधवांसाठी जिल्ह्यातील विविध संस्था, संघटना, व्यक्तिंनी आतापर्यंत ३ कोटी १६ लाख ६० हजार ८४६ रुपयांचे योगदान मुख्यमंत्री सहाय्यता निधीत दिले आहे.

 जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामार्फत मिळालेल्या माहितीनुसार, आज दि.१२ रोजीच्या दुपारी १२ वाजेपर्यंत जिल्ह्यातून ३ कोटी १६ लाख ६० हजार ८४६ रुपये इतका निधी जमा झाला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्ह्यातील सर्व सामाजिक, सार्वजनिक, संस्था, उद्योजक, उद्योग समूह सामान्य जनता यांना आवाहन केले होते. त्यास प्रतिसाद देत लोकांनी मदतीचा ओघ सुरु केला. उद्योग क्षेत्राने त्यात भरीव योगदान दिले. सीड इंडस्ट्रीज असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या संस्थेने १ कोटी रुपये, आणि मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगर या संस्थेने एक कोटी रुपये असे योगदान दिले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या मदतीतून ८६ हजार ३०० रुपये जमा करण्यात आले. मराठी अर्थशास्त्र परिषद ३ लाख ६२ हजार, जिल्हा मजूर कामगार सहकारी संघ २ लक्ष रुपये, प्रोफेशन साऊंड ॲण्ड लाईट असो. ने १ लाख १११ रुपये दिले.संत एकनाथ मंदीर संस्थानाने ५१ हजार रुपये, शेंद्रा कमंगर ग्रामसभा १ लाख ११ हजार रुपये, छत्रपती संभाजीनगर तहसिलदार कार्यालयाने २ लाख १२ हजार ४७५ रुपये, ग्राम औद्योगिक शिक्षण मंडळ २५लाख रुपये अशा विविध २९ संस्थांनी सर्व मिळून ३ कोटी १६ लाख ६० हजार ८४६ रुपये इतकी देणगी दिली आहे.

 मुख्यमंत्री सहायता निधीत नागरिकांनी योगदान द्यावे,असे आवाहनही जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

इकरा अपहरण प्रकरणाच्या उच्चस्तरीय तपासाची खा. कल्याण काळे यांची मागणी,शिष्टमंडळाने दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

vishwatmaklokswamivarta

रत्नागिरी, रायगड जिल्ह्याला पुढील २४ तासाकरिता रेड अलर्ट रत्नागिरी जिल्ह्यात ८८.१ मिमी पावसाची नोंद

रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर तसेच दि. ६ व ७ जुलै रोजी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केल्याने जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, नदी-नाले, धबधबे व पूरग्रस्त भागांपासून दूर राहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन केले आहे.

भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे ‘स्टॉकहोम कॉन्फरन्स’मध्ये आज भाषण स्वीडनमधील भारतीय समुदायासोबत संस्मरणीय संवाद

मसलगा सिंचन प्रकल्पाच्या दुरुस्तीची कार्यवाही गतीने करावी-पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले▪️पुढील पावसाळ्यात पूर्णक्षमतेने पाणीसाठा होण्याच्या दृष्टीने काम व्हावे

राज्याचे रत्ने व आभूषणे धोरण – २०२५ जाहीर राज्याच्या गुंतवणूक, औद्योगिक क्षेत्रासाठी झळाळी,एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक, पाच लाख नवीन रोजगार निर्मितीचे उद्द‍िष्ट..