vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

सागरी सुरक्षेसाठी १५ हाय स्पीड गस्ती नौका लवकरच दाखल होणार – मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

सागरी सुरक्षेसाठी १५ हाय स्पीड गस्ती नौका लवकरच दाखल होणार – मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

 

नागपूर प्रतिनिधी : परराज्यातून राज्याच्या सागरी क्षेत्रात येणाऱ्या मच्छिमार नौकांमुळे राज्यातील मच्छिमारांचे आर्थिक नुकसान होते. याचा विचार करून या परराज्यातील मच्छिमारी नौकांवर कारवाई करण्यासाठी व किनारपट्टीची सुरक्षा भक्कम करण्याच्या दृष्टीने लवकरच १५ हाय स्पीड गस्ती नौका राज्यात दाखल होणार असल्याची माहिती मस्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी आज विधानसभेत दिली. सदस्य भास्कर जाधव यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना ते बोलत होते.

मत्स्यव्यवसाय मंत्री राणे म्हणाले की, सध्या गस्तीसाठी मत्स्यव्यवसाय विभागाकडे लाकडी बोटी आहेत. या बोटींमधून परराज्यातून आलेल्या मच्छिमार नौकांचा पाठलाग करून त्यांना पकडणे शक्य होत नाही म्हणून हाय स्पीड नौका घेण्यात येत आहेत. त्याशिवाय ड्रोनच्या मदतीने गस्त घातली जात आहे. त्यामाध्यमातून परराज्यातील नौका, अवैध मासेमारी आणि इतर बेकायदेशीर गोष्टींवर नियंत्रण आणले असल्याची माहिती मस्यव्यवसाय मंत्री राणे यांनी दिली.

 

०००

संबंधित पोस्ट

दिव्यांगांप्रती सन्मान आवश्यक आहे. दिव्यांगासाठी आता स्वतंत्र विभागाची स्थापना झाली असल्याने त्यांना मिळणाऱ्या विविध योजनांचा लाभ सुलभ होण्यास मदत झाली असून जिल्हा प्रशासन दिव्यांगांना सक्षम बनविण्यासाठी कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांनी केले.

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी यांच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचा थाटात शुभारंभ-अत्याधुनिक क्रीडा सुविधांच्या माध्यमातून बुलढाण्याचा नावलौकिक वाढविणार – आमदार संजय गायकवाड

vishwatmaklokswamivarta

श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला महाराष्ट्राच्या प्रमुख महोत्सवाचा दर्जा- पर्यटन मंत्री शंभूराज देसाई महोत्सवात स्थानिक लोकपरंपरांचे होणार सादरीकरण..

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिका नमुंमपा अधिकारी, कर्मचारी यांना दिवाळीनिमित्त रू. 34,500 सानुग्रह अनुदान जाहीर

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात स्वच्छ व पिण्यायोग्य पाणीपुरवठा…

विद्यार्थी केंद्रबिंदू ठेवून विकासाचे नियोजन करणार – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा सामाजिक न्याय दिन साजरा घर घर संविधान योजनेचा शुभारंभ

vishwatmaklokswamivarta