vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

अमरावती मेस्को क्षेत्रीय कार्यालय येथेमाजी सैनिकांसाठी लिपिक पदांची भरती

अमरावती मेस्को क्षेत्रीय कार्यालय येथेमाजी सैनिकांसाठी लिपिक पदांची भरती

        अमरावती, प्रतिनिधी मेस्को क्षेत्रीय कार्यालय, सैनिकी मुलांचे वसतिगृह नवसारी, अमरावती येथे भारतीय संरक्षण दलातून निवृत्त झालेल्या माजी सैनिकांसाठी ‘लिपिक नि टंकलेखक’ या पदाच्या एकूण दोन जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या पदासाठी सशस्त्र सेना दलातील निवृत्त जेसीओ, ओआर, वीर पत्नी अर्ज करू शकतात. उमेदवाराचे वय 57 वर्षांपेक्षा जास्त नसावे आणि तो महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. शैक्षणिक पात्रतेमध्ये मराठी भाषेचे ज्ञान, एम.एस. ऑफिस, अकाऊंटिंग आणि मराठी व इंग्रजी टायपिंगचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक असून त्याबाबतचे प्रमाणपत्र जोडणे अनिवार्य आहे.लष्करी सेवेत कार्यालयीन अधीक्षक किंवा मुख्य लिपिक पदाचा अनुभव असलेल्यांना निवडीत प्राधान्य दिले जाईल. तसेच उमेदवाराची वैद्यकीय श्रेणी शक्यतो ‘शार्प-1’ असावी.

    निवड झालेल्या उमेदवारास दरमहा तीस हजार रुपये मानधन दिले जाईल. इच्छुकांनी आपले अर्ज 5 जानेवारी 2026 पर्यंत ro-amravati@mescoltd.co.in या ई-मेलवर किंवा ‘क्षेत्रीय कार्यालय अमरावती, सैनिकी मुलांचे वसतिगृह, नवसारी, अमरावती-४४४६०४’ या पत्त्यावर पोस्टाने पाठवावेत. अधिक माहितीसाठी संपर्क क्रंमाक-0271-2952040, मोबाईल नंबर- 9373164962 तसेच ७४९५०९७९५८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

000000

संबंधित पोस्ट

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026जिल्ह्यातील 1 लाख 5 हजार 128 शेतकरी पात्र; ई.के.वाय.सी. फक्त १४ हजार जणांचे पूर्णआधार प्रमाणीकरण तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन

दिल्लीतील १७ मेट्रो स्थानके आज सकाळी ०७:३० वाजेपासून पुढील आदेशापर्यंत बंद; राजीव चौक, मंडी हाऊस आणि केंद्रीय सचिवालयात इंटरचेंज सुविधा सुरू!

सोलापूर, परभणी, नांदेड, गडचिरोली जिल्ह्यात मदत व बचाव कार्यासाठी पथके तैनात राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती

जिल्हा रुग्णालयात आरोग्य तपासणी शिबीर

आबासाहेब वीर सामाजिक पुरस्काराने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा गौरवदेशात लवकरच १००टक्के इथेनॉल इंधनावर वाहने धावणार पुणे सातारा प्रवास अवघ्या एका तासात पूर्ण होणार – केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी

गुणवत्तापूर्ण कामे करण्याला प्राधान्य द्यावे – सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले