vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

नगरपरिषद निवडणूक : मतमोजणीची तयारी पूर्ण-नगराध्यक्षासाठी २३ तर नगरसेवकसाठी ३३९ उमेदवारांचा निकाल होणार स्पष्ट..

नगरपरिषद निवडणूक : मतमोजणीची तयारी पूर्ण-नगराध्यक्षासाठी २३ तर नगरसेवकसाठी ३३९ उमेदवारांचा निकाल होणार स्पष्ट..

गडचिरोली, प्रतिनिधी : जिल्ह्यातील गडचिरोली, देसाईगंज व आरमोरी या तीन नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २ व २० डिसेंबर रोजी मतदान घेण्यात आले असून २१ डिसेंबर २०२५ रोजी होणाऱ्या मतमोजणीसाठी प्रशासनाने सर्व आवश्यक तयारी पूर्ण केली आहे.

गडचिरोली नगरपरिषदेची मतमोजणी कृषी महाविद्यालय, सोनापूर येथे होणार असून येथे प्रत्यक्ष मतमोजणीसाठी ७ व पोस्टल बॅलेटसाठी १ असे एकूण ८ टेबल असतील. देसाईगंज नगरपरिषदेची मतमोजणी देसाईगंज नगरपरिषद सांस्कृतिक सभागृहात पार पडणार असून येथे प्रत्यक्ष मतमोजणीसाठी १० व पोस्टल बॅलेटसाठी १ असे एकूण ११ टेबल निश्चित करण्यात आले आहेत. आरमोरी नगरपरिषदेची मतमोजणी तालुका लघु पशुवैद्यकीय चिकित्सालय येथे होणार असून येथे प्रत्यक्ष मतमोजणीसाठी ३ व पोस्टल बॅलेटसाठी १ असे एकूण ४ टेबल ठेवण्यात आले आहेत.

या निवडणुकीत तीनही नगरपरिषदांमधून नगराध्यक्ष पदासाठी एकूण २३ तर नगरसेवक पदासाठी ३३९ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. गडचिरोली नगरपरिषदेत नगराध्यक्ष पदासाठी ७ तर नगरसेवक पदासाठी १३१ उमेदवार, देसाईगंज नगरपरिषदेत नगराध्यक्ष पदासाठी ६ व नगरसेवक पदासाठी १०० उमेदवार, तर आरमोरी नगरपरिषदेत नगराध्यक्ष पदासाठी १० व नगरसेवक पदासाठी १०८ उमेदवारांनी निवडणूक लढवली आहे.

मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक व सुरळीतपणे पार पडावी यासाठी सर्व तांत्रिक, प्रशासकीय व सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

संबंधित पोस्ट

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) मार्फत ठाणे महानगरपालिका क्षेत्रात रस्ते विकासाची कामे डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश

महामार्गांवरील अपघात रोखण्यासाठी कठोर उपाययोजना;दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई– परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याकरीता रायगड जिल्ह्यातील खाजगी आस्थापनांना रिक्तपदे अधिसूचित करण्याचे आवाहन

बीकेसीतील तीन भूखंडांच्या भाडेपट्ट्यातून एमएमआरडीएला मिळाले ३ हजार ८४० कोटी ४९ लाख; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांना वाटपपत्र प्रदान महाराष्ट्राची आर्थिक केंद्र म्हणून दमदार वाटचाल; १५ हजार हाय-टेक नोकऱ्यांची निर्मिती शक्य

अलिबाग जिल्हा न्यायालयातील लोकअभिरक्षक सेवेचा जनसामान्यांना आधार-आर्थिक परिस्थिती नसणाऱ्या अशीलांना मोफत कायदेशीर मदत, विधी सेवा प्राधिकरणाचा उपक्रम.

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र मंदिर महासंघाचे प्रसिद्धीपत्रक ! उज्जैनच्या संतांच्या मागणीला मंदिर महासंघाचा जाहीर पाठिंबा ,गोमांस खाणारे व मूर्तीपूजा न मानणारे यांना मंदिरात प्रवेशबंदी करा ! – मंदिर महासंघ

vishwatmaklokswamivarta