vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतरठळक बातम्याप्रदेश

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे निकाल लवकरच जाहीर होणार

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे निकाल लवकरच जाहीर होणार

राज्य प्रतिनिधी

नगरपालिका निवडणुकीची मतमोजणी सुरू असल्यानं नेमके काय निकाल घोषित होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच हे निकाल तपासण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर गेले असता वेबसाईट बंद असल्याचं दिसून येत आहे. आयोगाची वेबसाईट जवळपास सकाळी 11 वाजल्यापासून बंद आहे. त्यामुळे निकालाचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी वेबसाईटला भेट देणाऱ्यांना याबाबतची माहिती जाणून घेण्यात अडथळे येत आहेत.

राज्यातील एकूण 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींसाठीचे मतदान पार पडले आहे. आज (21 डिसेंबर) मतमोजणीनंतर निकाल जाहीर होतील. सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली असून मतांचा कौल कोणाला मिळतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 288 नगरपरिषदा व नगर पंचायत निवडणुकांचा कार्यक्रम 4 नोव्हेंबरला जाहीर केला होता. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 2 डिसेंबरला 263 नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी मतदान झाले.. तर, आज मतमोजणीनंतर चित्र स्पष्ट होणार आहे. संध्याकाळपर्यंत सर्व निकाल हाती येतील, असा अंदाज आहे.

या निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीतील भाजप, शिवसेना आणि अजित पवार गट अनेक ठिकाणी एकमेकांविरोधात लढले. यावेळी बऱ्याच ठिकाणी वाद आणि तक्रारी पाहायला मिळाल्या.या पार्श्वभूमीवर आज होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. कोण जिंकणार हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

संबंधित पोस्ट

हिंद-दी-चादर’ कार्यक्रमस्थळी नवी मुंबई व पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तांकडून व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी…

मराठवाड्याला दुष्काळमुक्त करु – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

महाराष्ट्र कुस्ती संघटनेच्या जिल्हाप्रमुखपदी संजय मिसाळ 

गेटवे-एलिफंटा जलवाहतूक सक्षम करण्यासाठी बोट आधुनिकीकरणावर भर मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक

महिलांना खऱ्या अर्थाने समानतेच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध – वनमंत्री गणेश नाईक ‘माविम सुवर्ण महोत्सव- नव तेजस्विनी २०२५’ चे उद्घाटन

रेणापूर तालुक्याच्या संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्षपदी श्री. सतीश आंबेकर यांची नियुक्ती… 👏🏻🎉