vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांसाठी अर्ज पाठवण्याचे आवाहन

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांसाठी अर्ज पाठवण्याचे आवाहन

नवी दिल्ली प्रतिनिधी- मराठी भाषेतल्या साहित्यनिर्मितीबद्दल राज्य शासनाच्यावतीने दिल्या जाणाऱ्या यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार 2025 यासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. 1 जानेवारी ते 30 डिसेंबर 2025 या कालावधीत प्रकाशित झालेली प्रथम आवृत्ती पुस्तके या स्पर्धेसाठी पात्र आहेत. मुंबईच्या रवींद्र नाट्यमंदिरात येत्या 30 जानेवारी 2026 पर्यंत महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडे पुस्तके पाठवावीत, असे आवाहन मंडळाच्या सचिवांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

मंडळाच्या कार्यालयात तसेच मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळता इतर ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात तर ‘सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कारा’साठी महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली येथे प्रवेशिका पाठविता येणार. प्रवेशिका विनामूल्य उपलब्ध आहेत. लेखक आणि प्रकाशक या स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठवू शकतात.

‘सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कार’ हा खास बृहन्महाराष्ट्रातील उत्कृष्ट साहित्य निर्मितीसाठी प्रदान करण्यात येणार आहे. या श्रेणीत उत्कृष्ट साहित्य निर्मितीसाठी साहित्याच्या सर्व प्रकारातील साहित्यकृती या पुरस्कारासाठी पाठविता येणार असून उत्कृष्ट साहित्यकृतीस ‘सयाजी महाराज गायकवाड पुरस्कार’ (पुरस्कार रक्कम 1,00,000 रूपये) प्रदान करण्यात येणार आहे

बृहन्महाराष्ट्र क्षेत्रातील विजेत्यांसाठी ‘सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कार’ (सर्व साहित्य प्रकार) साठी निवड केली जाईल. प्रवेशिका पूर्णत: भरुन आवश्यक साहित्यासह सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात किंवा महाराष्ट्र परिचय केंद्र नवी दिल्ली यांच्याकडे 31 जानेवारी 2026 पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठवाव्यात. लेखक / प्रकाशक या स्पर्धेसाठी प्रवेशिका दाखल करु शकतात.

महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ‘नवीन संदेश’ या सदरात ‘स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड:मय पुरस्कार नियमावली व प्रवेशिका’ या शीर्षाखाली व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या http://msblc.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रवेशिका व नियम पुस्तिका उपलब्ध आहे. यासह या स्पर्धेची नियमावली व प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्य मंदिर इमारत, दूसरा मजला, सयानी रोड, प्रभा देवी, मुंबई-400 025 यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे. तसेच, बृहन्महाराष्ट्रातील लेखक व प्रकाशकांसाठी महाराष्ट्र परिचय केंद्र, ए/8, स्टेट एम्पोरिया बिल्डींग, बाबाखडक सिंह मार्ग, नवी दिल्ली या कार्यालयातही स्पर्धेची नियमावली व प्रवेशिका उपलब्ध आहे.

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार योजनेअंतर्गत एकूण चार विभागात 35 साहित्य प्रकारांसाठी प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत. प्रौढ वाड्.मय विभागात एकूण 22 साहित्य प्रकार असून प्रत्येकी 1 लाख रुपये या प्रमाणे एकूण 22 लाख रूपयांची पुरस्कारांची रक्कम आहे.बाल वाङ्मय विभागात एकूण 6 साहित्य प्रकारात प्रत्येकी 50 हजार रुपये याप्रमाणे एकूण 3 लाख रूपयांची पुरस्कार रक्कम आहे.

************

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात इंधनाचा सुरळीत पुरवठा राखत समानतेने इंधन वाटप करा- जिल्हाधिकारी पंकज आशिया जिल्हाधिकारी कार्यालयात पेट्रोल, डिझेल पुरवठ्याबाबत आढावा बैठक संपन्न

इंदिरा गांधी राष्ट्रीय योजनेतील लाभार्थ्यांनी मोबाईल ॲपद्वारे हयातीचे प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन

भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला न्याय द्या भास्कर आबा दानवे यांच्या उमेदवारीसाठी कार्यकर्त्यांचा आग्रह,माजी मंत्री आ. बबनराव लोणीकर व ग्रामीण जिल्हाध्यक्ष आ.नारायण कुचे यांना निवेदन

वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्तानं अकोला इथं भव्य सामूहिक गायन सोहळा पार पडला. 

vishwatmaklokswamivarta

माजी मुख्यमंत्री पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील यांनापालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे अभिवादन.. 

मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांच्या प्रयत्नांना यश, पारंपरिक देशी खेळाडूंच्या शासकीय नियुक्त्यांबाबत शासन स्तरावर प्रयत्न होणार.ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव पारंपरिक देशी क्रीडा महाकुंभाच्या उद्घटनात क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांचे आश्वासन