vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

पथनाट्याच्या माध्यमातून जिल्ह्यात एचआयव्ही/एड्स जनजागृती मोहीम

पथनाट्याच्या माध्यमातून जिल्ह्यात एचआयव्ही/एड्स जनजागृती मोहीम

 

रायगड–अलिबाग, ( प्रतिनिधी-महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी, वडाळा, मुंबई येथील प्रकल्प संचालक तसेच जिल्हाधिकारी तथा जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीचे अध्यक्ष यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निशिकांत पाटील यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात एचआयव्ही/एड्स जनजागृतीसाठी पथनाट्यांचे आयोजन करण्यात आले आहे.

या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील एकूण १५ ठिकाणी दोन कलापथकांच्या माध्यमातून दिनांक २४ ते २७ डिसेंबर २०२५ या कालावधीत एचआयव्ही/एड्स विषयक जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. शाहीर पांडुरंग हनुमंत गवळी व सहकारी, सांगली यांच्या माध्यमातून पोलादपूर (शिवाजी चौक), महाड (बाजारपेठ), माणगांव (एस.टी. स्टॅन्ड), म्हसळा (प्राथमिक आरोग्य केंद्र), श्रीवर्धन (एस.टी. स्टॅन्ड), मुरुड–जंजिरा (समुद्रकिनारा) व रोहा (एस.टी. स्टॅन्ड) येथे पथनाट्ये सादर करण्यात येणार आहेत. तर शाहीर आलम रमजान पाटवेगार, सांगली यांच्या माध्यमातून अलिबाग (आंबेडकर चौक), पेण (एस.टी. स्टॅन्ड), खोपोली (शिळफाटा), पाली–सुधागड (प्राथमिक आरोग्य केंद्र), पनवेल (एस.टी. स्टॅन्ड), उरण (एस.टी. स्टॅन्ड), कशेळे (ग्रामीण रुग्णालय) व कर्जत (रेल्वे स्टेशन) येथे कार्यक्रम होणार आहेत

काल दि. २४ डिसेंबर रोजी अलिबाग येथील आंबेडकर चौकात शाहीर आलम रमजान पाटवेगार यांच्या पथनाट्याद्वारे एचआयव्ही/एड्स म्हणजे काय, त्याची कारणे, लक्षणे, समज–गैरसमज, २०१७ चा कायदा, आयसीटीसी केंद्रे, टोल फ्री क्रमांक १०९७ तसेच NACO ॲप याविषयी लोकगीतांच्या माध्यमातून प्रभावीपणे जनजागृती करण्यात आली.

यावेळी एचआयव्ही संसर्ग होण्याचे चार प्रमुख मार्ग स्पष्ट करण्यात आले. त्यामध्ये असुरक्षित लैंगिक संबंध, एचआयव्ही संसर्गित व्यक्तीचीच सुई व सिरिंजचा वापर, संसर्गित रक्त देण्यात आल्यास तसेच एचआयव्ही बाधित पालकांकडून होणाऱ्या बाळाला संसर्ग होण्याची शक्यता यांचा समावेश आहे. प्रत्येक नागरिकांनी व विशेषतः गरोदर मातांनी शासकीय दवाखान्यातील आयसीटीसी समुपदेशन व तपासणी केंद्रातून एचआयव्हीची तपासणी करून घ्यावी, नेहमी नवीन सुईचा वापर करावा, रक्ताची गरज भासल्यास प्रमाणित रक्तपेढीतूनच रक्त घ्यावे तसेच एचआयव्ही संसर्ग आढळल्यास मोफत उपचार घ्यावेत, असे आवाहन करण्यात आले.या कार्यक्रमास जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक संजय माने, आयसीटीसी समुपदेशक कल्पना गाडे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ अमित सोनवणे, महाराष्ट्र सामाजिक विकास संस्था, पेण येथील लिंक वर्कर श्रीमती करुणा म्हात्रे व श्रीमती मिनाली साळवकर यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते

सदर उपक्रम यशस्वी होण्यासाठी जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध विभागांतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालयांतील समुपदेशक व प्रयोगशाळा तंत्रज्ञ तसेच महाराष्ट्र सामाजिक विकास संस्था, पेण, लोकपरिषद संस्था, पनवेल, आधार ट्रस्ट, पनवेल, सक्षम संस्था, रोहा आणि परिवर्तन संस्था, पनवेल यांचे सहकार्य लाभत आहे.

000

संबंधित पोस्ट

एच आय व्ही संसर्गित रूग्णांच्या पुनर्वसनासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत- जिल्हाधिकारी अशोक काकडे,जिल्हास्तरीय एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीच्या बैठकीत निर्देश

राष्ट्रीय नमुना पाहणीच्या आरोग्य विषयक सर्वेक्षणासाठी सहकार्य करावे

vishwatmaklokswamivarta

सफाई अपनाओ – बिमारी भगाओ’ अभियानाचा नवी मुंबईत उत्साहात प्रारंभ

महिलांच्या आरोग्याच्या दिशेने बुलढाण्यात महत्वाचे पाऊल-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील* एचपीव्ही लसीकरण मोहीम लवकरच सुरू   * 14 ते 15 वर्षे वयोगटातील मुलींना मोफत लस

vishwatmaklokswamivarta

वैद्यकीय शिक्षणातील मूल्यमापन पद्धतीत नवे बदल आवश्यक पल्स 2026 मधील चर्चासत्रात भर

शासकीय रुग्णालयात सेवा अधिक दर्जेदार द्याव्यात-औषध व अन्नपदार्थ मधील भेसळीला प्रतिबंध करण्यासाठी काटेकोर उपाययोजना करावी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस