vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञानस्थानिक बातम्या

पॅन – आधार लिंक करण्यासाठी शेवटची संधी!

नवी दिल्ली : तुम्ही तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड अजूनही लिंक केले नसेल, तर हे लवकर करा. यासाठी फक्त सात दिवस शिल्लक आहेत. ३१ डिसेंबरनंतर पॅन आणि आधार लिंक न करणाऱ्यांना १००० रुपये दंड आकारला जाईल. शिवाय, ज्यांचे पॅन-आधार लिंक नसेल, त्यांचे पॅन कार्ड निष्क्रिय देखील होऊ शकते. नियमांनुसार, पॅन आणि आधार लिंक करणे सर्वांसाठी अनिवार्य आहे. नवीन पॅन कार्डसाठी अर्ज करणाऱ्यांना आधार-आधारित पडताळणी करणे आवश्यक आहे. ३१ डिसेंबरच्या मुदतीनंतर, ज्यांच्याकडे पॅन आणि आधार दोन्ही असूनही त्यांनी ते लिंक केलेले नाही, त्यांना विलंब शुल्क लागू होईल. दरम्यान, पॅन-आधार लिंक करण्यासाठी नियमांची यादीही जाहीर करण्यात आली आहे, त्यानुसारच तुम्हाला ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे. काय आहेत नियम आणि अंतिम मुदत?

  •  प्राप्तिकर विभागाने ३ एप्रिल २०२५ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, ज्यांचे आधार-पॅन लिंक नसेल, त्यांचे पॅन या तारखेनंतर निष्क्रिय होईल.
  •  ज्यांना १ ऑक्टोबर २०२४ नंतर पॅन कार्ड वाटप करण्यात आले आहे, त्यांनाही या वर्षाच्या अखेरीस (३१ डिसेंबरपर्यंत) पॅन आधारशी लिंक करणे अनिवार्य आहे.
  • पॅन आधारशी लिंक करण्याची यापूर्वीची अंतिम मुदत ३१ मे २०२४ होती.
  • जर एखादी व्यक्ती ३१ डिसेंबर २०२५ रोजी पॅन आधारशी लिंक करत असेल, तर तिला १,००० रुपये दंड भरावा लागेल, कारण लिंक करण्याची मूळ तारीख आधीच उलटून गेली आहे.

जर तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय झाले, तर तुम्हाला खालील समस्यांना सामोरे जावे लागू शकते :  

  • प्राप्तिकर परतावा भरण्यात अडचण येईल.
  • परतावा अडकू शकतो.
  • नवीन पॅन मिळवण्यासाठी दीर्घ प्रक्रियेतून जावे लागेल.
  • अधिक दराने टीडीएस आणि टीसीएस भरावा लागू शकतो.
  • फॉर्म 26AS चा वापर करता येणार नाही.
  • टीसीएस/टीडीएस प्रमाणपत्रे उपलब्ध होणार नाहीत.
  • बँक खाते उघडता येणार नाही.
  • क्रेडिट/डेबिट कार्ड घेता येणार नाही.
  • बँकेत ५०,००० रुपयांपेक्षा जास्त रोख जमा करता येणार नाही.
  • १०,००० रुपयांपेक्षा जास्त बँक व्यवहार करता येणार नाहीत.
  • केव्हायसी प्रक्रिया पूर्ण होऊ शकणार नाही.
  • सरकारी सेवांपासून वंचित राहावे लागू शकते.
  • म्युच्युअल फंड आणि शेअर मार्केटमधील गुंतवणूक थांबू शकते.

संबंधित पोस्ट

जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत परीक्षा मार्गदर्शन शिबिर व सत्कार सोहळा संपन्न,स्पर्धा परीक्षेची तयारी करताना स्वयंप्रेरणा महत्त्वपूर्ण  -जिल्हाधिकारी आशिष येरेकर

लातूर येथे राज्य रस्ता सुरक्षा अभियान २०२६ ला प्रारंभ

देशातील १०३, मुंबईतील परळ, चिंचपोकळी, माटुंगा आणि वडाळारोडसह, राज्यातील १५ रेल्वे स्थानकांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण,छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा होणार पुनर्विकास- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,दोन हजार आठशे कोटी रुपयांचा निधी होणार उपलब्ध

धानाकरिता १३०६.४६ कोटी व भरडधान्यकरिता२१.८४ कोटी निधी वितरितखरीप हंगाम २०२५–२६ अंतर्गत धान/ भरड धान्य खरेदी योजना प्रभावीपणे राबविण्यास राज्य शासन कटिबद्ध.

vishwatmaklokswamivarta

नव्या जीएसटी सुधारणांतून भारताच्या आर्थिक विकासाला नवी गती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘मेरा देश पहले- द अनटोल्ड स्टोरी ऑफ श्री. नरेंद्र मोदी’ कार्यक्रमात मोदीजींच्या जीवनाचे प्रेरणादायी पैलूंचे दर्शन

vishwatmaklokswamivarta

अरबी समुद्रातील उच्च भरतीच्या लाटांचा ऑरेंज अलर्टमुळे मच्छीमारांना सतर्कतेचे आवाहन- किनारपट्टीवरील नागरिक – पर्यटकांनी समुद्रकिनाऱ्यावर जाणे टाळण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta