vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतरप्रदेशस्थानिक बातम्या

संत सेवालाल महाराज बंजारा तांडा समृध्दी  योजनेअंतर्गत 49 महसूली गावे घोषित करण्याबाबत बैठक संपन्न

संत सेवालाल महाराज बंजारा तांडा समृध्दी  योजनेअंतर्गत 49 महसूली गावे घोषित करण्याबाबत बैठक संपन्न

 

जालना, प्रतिनिधी :- शासन निर्णयानुसार बंजारा /लमाण तांड्यासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण करणे व सामुहिक विकासाच्या विविध मुलभुत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी संत सेवालाल महाराज बंजारा/ लमाण तांडा समृध्दी योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. ज्यामध्ये महसुल दर्जा प्राप्त व शासन निर्णयातील तरतुदीनुसार लोकसंख्या असलेल्या तांडा वस्ती येथे स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करणे व महसुल दर्जा देणेस पात्र असलेल्या तांड्याना महसुली गावाचा दर्जा/तांडा देणे या सदंर्भात जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय समिती अध्यक्ष आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली सर्व शासकिय व अशासकिय समिती मधील सदस्यांची दि. 26 डिसेंबर 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे बैठक पार पडली.

या बैठकीत जिल्हातील 49 बंजारा/लमाण तांड्यांना महसूल गाव घोषित करण्याबाबतच्या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. तांडयांना महसूली गावांचा दर्जा देण्यासाठी महसूल मंत्री यांनी वेळोवेळी आढावा बैठका घेतल्या. तसेच येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी जिल्हा समितीस मार्गदर्शन केले व प्रोत्साहन दिले. त्याप्रमाणे जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी सदर प्रकरणात वैयक्तीक लक्ष घालून पाठपुरावा केला व त्याप्रमाणे 49 प्रस्तावास जिल्हा समितीने मंजुरी दिली.

 बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, जिल्हा परिषद प्र. उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदिप पवार, घनसावंगी तहसिलदार पूजा वंजारी, बदनापूर प्र. तहसिलदार अतुल बने, जाफराबाद गटविकास अधिकारी देविदास मगर, मंठाचे गटविकास अधिकारी एस व्ही गगनशेने, परतुर गटविकास अधिकारी आर. एल. तांगडे, घनसावंगी गटविकास अधिकारी ऐश्वर्या चितारी, अंबड सहाय्यक गटविकास अधिकारी समीर जाधव, विस्तार अधिकारी आर. तट्टू, अशासकीय सदस्य उद्धव पवार ,अर्जुन राठोड, गणेश राठोड यांची उपस्थिती होती.

  राज्यातील बंजारा लमाण समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या संत सेवालाल महाराज बंजारा/ लमाण तांडा समृद्धी योजना अंतर्गत तांड्यांना स्वतंत्र महसूल गाव घोषित करण्याबाबत गठीत करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत आज जालना तालुक्यातील 12, बदनापूर तालुक्यातील 05, अंबड तालुक्यातील 06 व मंठा तालुक्यातील 26 अशा एकूण 49 प्रस्तावावर चर्चा करण्यात आली व ते नियमाप्रमाणे मंजूर करुन शासनाकडे सादर केले जाणार आहेत. विविध तालुक्यांतील पात्र तांड्यांचे प्रस्ताव, त्यांची लोकसंख्या, मूलभूत सुविधा, प्रशासकीय निकष तसेच शासनाच्या मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने सविस्तर आढावा घेण्यात आला. महसूल गाव घोषित करण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे, अहवाल आणि पूर्तता बाबींची तपासणी करून पुढील कार्यवाहीबाबत निर्देश जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले. जिल्हास्तरावर एकूण 78 प्रस्ताव प्राप्त झाले असून, ज्या प्रस्तावांमध्ये त्रुटी किंवा कागदपत्रांची कमतरता आहे, ती तातडीने पूर्ण करुन प्रस्ताव पुन्हा सादर करणेबाबतचे निर्देश जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले आहे. यापुढेही महसूल मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रस्ताव लवकरात लवकर प्राप्त करून घेऊन शासनास सादर करण्यात येतील. असेही सांगितले.

बैठकीमध्ये महसूली गावांचा दर्जा देण्यासाठी मंजूर झालेले तांडे पुढीलप्रमाणे आहे.

अ.क्र. तालुका मुळ महसूल गाव प्रस्तावित तांडयाचे नाव1 2 3 4

१ जालना काकडा वसारामनाईकतांडा

२ जालना पारेगाव सेवागडतांडा

३ जालना वडगाव अमृनाईकतांडा

४ जालना पवारतांडा

५ जालना वखारी वखारी तांडा

६ जालना मानेगाव खा. मानेगाव वाडीतांडा 1

७ जालना मानेगाव खा. मानेगाव वाडीतांडा

८ जालना वडीवाडी वडीवाडी तांडा

९ जालना पत्रातांडा सेवालाल नगर

10 जालना नेर काळामाथा तांडा

11 जालना तिमानाईक तांड

12 जालना नेर तांडा,13 बदनापूर तुपेवाडी काळूनाईक तांडा,14 बदनापूर वसंतनगर तांडा,15 बदनापूर गोकुळवाडी गोकुळवाडी तांडा,16 बदनापूर बावणेपांगरी गोकुळनगर तांडा,17 बदनापूर गारवाडी तांडा,18 अंबड

रुई महाराजा तांडा,19 अंबड श्रीराम तांडा,20 अंबड मसई मसई तांडा -१,

21 अंबड सोनक पिंपळगांव सोनक पिंपळगांव तांडा,22 अंबड बोरी बोरी तांडा,23 अंबड गोंविद पूर लालवाडी तांडा,24 मंठा ,दहीफळ खंदारे भुरानायक तांड,25 मंठा बुगानाईक तांडा,26 मंठा ,कानफोडी श्रीरामतांडा,27 मंठा कानफोडी तांडा,28 मंठा पिंपरखेडा खराबे वसंतराव नाईक नगर,पिंपरखेडा तांड

29 मंठा किर्ला किर्लातांडा,30 मंठा अंभोडा कदम सेवालाल नगर,31 मंठा दहा दहातांडा,32 मंठा वझर सरकटे वझर सरकटे तांडा,33 मंठा ढोकसाळ भासुनाईक

तांडा-34 मंठा टोकवाडी टोकवाडी तांडा,35 मंठा केहाळ वडगाव जयरामनगर नाईक तांडा,36 मंठा नायगाव प्र बामणी नायगाव तांडा,37 मंठा पांगरी बु . पांगरी बु तांडा(योगानंद बापूनगर),38 मंठा माहोरा माहोरा तांडा,39 मंठा तळणी वसंतनगर,40 मंठा केंधळी केंधळी तांडा,41 मंठा बेलोरा बेलोरा तांडा,42 मंठा लावणी लावणी तांडा,43 मंठा आकणी आकणी तांडा,44 मंठा पांगरी खु. किसन नाईक तांडा,45 मंठा आर्डा तोलाजी आर्डा तोलाजी तांडा46 मंठा सोनुनकरवाडी,पांगरीबु. शिवार सोनुनकर वाडी तांडा

47 मंठा विरगव्हाण संत सेवालाल महाराज विरगव्हाण तांडा,48 मंठा वाढेगाव पाढूर्णा वाढेगाव तांडा,49 मंठा देवठाणा उस्वद देवठाणा उस्वद

*-*-*-*-

संबंधित पोस्ट

नारायण मेघाजी लोखंडे सुरक्षा व आरोग्य पुरस्कार २०२५’ वितरण सोहळा उत्साहात संपन्न कामगार कायद्यातील सुधारणांमुळे कामगारांबरोबरच उद्योगांनाही फायदा- कामगार मंत्री आकाश फुंडकर

राहुरी विधानसभा पोटनिवडणूक खर्चाची काटेकोरपणे तपासणी करा – जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया ,खर्च निरीक्षक व्ही. कुमार यांच्याकडून पूर्वतयारीचा आढावा ; दैनंदिन अहवाल वेळेत सादर करण्याचे निर्देश उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा ४० लाख रुपये ; सर्व पथकांच्या वाहनांवर जीपीएस यंत्रणा

रावेर येथे महत्त्वाच्या गाड्यांचे थांबे देण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची रेल्वे बोर्डाचे चेअरमन यांच्याकडे मागणी

आचारसंहिता क्षेत्रातील ७६ जणांना २४ तासांत शस्त्र जमा करण्याचे आदेश

vishwatmaklokswamivarta

उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांना राज्यस्तरीय गुणवंत अधिकारी पुरस्कार जाहीर

ई-पीक पाहणी नोंदणी २४ मेपूर्वी करा जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांचे आवाहन